शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
6
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
7
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
8
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
9
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
10
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
11
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
12
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
13
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
14
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
15
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
16
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
17
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
18
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
19
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
20
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
Daily Top 2Weekly Top 5

शहरात १ कोटी एलईडी बल्ब वितरणाचे उद्दिष्ट रामराव मुंडे : एलईडी बल्बचे वितरण

By admin | Updated: October 30, 2015 00:17 IST

पुणे : पुणे शहरातील सुमारे ११ लाख घरगुती वीजग्राहकांना पर्यावरणपुरक १ कोटी एलईडी बल्ब वितरणाचे उद्दिष्ट आहे. प्रत्येक वीजग्राहकांस एकूण १० एलईडी बल्ब वितरीत करण्यात येणार असल्याचे महावितरणचे मुख्य अभियंता रामराव मुंडे यांनी सांगितले़

पुणे : पुणे शहरातील सुमारे ११ लाख घरगुती वीजग्राहकांना पर्यावरणपुरक १ कोटी एलईडी बल्ब वितरणाचे उद्दिष्ट आहे. प्रत्येक वीजग्राहकांस एकूण १० एलईडी बल्ब वितरीत करण्यात येणार असल्याचे महावितरणचे मुख्य अभियंता रामराव मुंडे यांनी सांगितले़
केंद्र सरकार पुरस्कृत डोमेस्टिक इफिशियंट लायटिंग प्रोग्राम अंतर्गत घरगुती वीजग्राहकांना एलईडी बल्ब वितरणाच्या योजनेचे उद्घाटन करण्यात आले़ या कार्यक्रमात ते बोलत होते़ कार्यक्रमाला अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे कार्याध्यक्ष सूयर्कांत पाठक, एनर्जी एफिशियंसी सर्व्हिसेसचे संचालक अरुणकुमार गुप्ता, प्रादेशिक व्यवस्थापक दीपक कोकाटे, महाऊर्जाचे व्यवस्थापक हेमंत पाटील, नगरसेवक अशोक येनपुरे, अधीक्षक अभियंता सुंदर लटपटे, शिवाजी चाफेकरांडे, नितीन गुजराथी, उल्हास शिंदे उपस्थित होते़
यावेळी सूयर्कांत पाठक यांनी सर्वप्रथम एलईडी बल्बची खरेदी केली. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते यावेळी १० वीजग्राहकांना एलईडी बल्बचे वितरण करण्यात आले.
ही योजना शहरासाठी येत्या ३ महिन्यांच्या कालावधीसाठी राबविण्यात येणार आहे. या योजनेतून प्रत्येक घरगुती वीजग्राहकाला प्रत्येकी ७ वॅटचे १० एलईडी बल्ब वितरीत करण्यात येणार आहे. पुणे शहरात महावितरणचे सुमारे ११ लाख घरगुती वीजग्राहक आहेत. प्रत्येक ग्राहकास प्रत्येकी १०० रुपयांचा एक बल्ब असे एकूण एकूण १० बल्ब मिळतील. हे १० बल्ब रोख रक्कमेतून एकाच वेळी खरेदी करता येईल. यात हप्त्यांची योजना असून वीजग्राहकांना १० पैकी जास्तीत जास्त ४ एलईडी बल्ब हे प्रत्येकी १० रुपये ॲडव्हान्स भरून खरेदी करता येईल व या ४ बल्बचे उर्वरित प्रत्येकी ९५रुपये १० हप्त्यांत देता येईल. पहिल्या टप्प्यात रास्ता पेठ विभागातील विभाग, उपविभाग, शाखा तसेच महावितरणचे अधिकृत वीजबील भरणा केंद्र या ठिकाणी काऊंटर शुक्रवारीपासून सुरु होत आहेत. त्यानंतर पुणे शहरात सर्वच ठिकाणी ही योजना टप्प्याटप्प्याने अंमलात येणार आहे. थकबाकीदार नसलेल्या वीजग्राहकांनी चालू देयकासोबत ओळखपत्र, रहिवासी पुरावा दिल्यानंतर एलईडी बल्ब वितरीत करण्यात येतील. या बल्बची तीन वर्षांची वारंटी असून वारंटी काळामध्ये बल्ब बदलून मिळणार आहे. प्रत्येक बल्बच्या वापरातील वीजबचतीमुळे वार्षिक वीजबिलात सुमारे १८० रुपयांची बचत होणार आहे.