शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
3
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
4
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
5
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
6
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
7
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
8
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
9
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
10
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
11
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
12
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
13
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
14
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
15
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
16
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
17
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
18
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
19
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
20
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
Daily Top 2Weekly Top 5

काश्मीर हिंसाचारातील मृतांची संख्या ३४ वर

By admin | Updated: July 14, 2016 03:09 IST

जम्मू आणि काश्मीरमध्ये गेले सहा दिवस हिंसाचार आणि रक्तपात सुरू असतानाच, या वावटळीतून बाहेर काढण्यासाठी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनी बुधवारी लोकांनी सहकार्य करावे

श्रीनगर/नवी दिल्ली : जम्मू आणि काश्मीरमध्ये गेले सहा दिवस हिंसाचार आणि रक्तपात सुरू असतानाच, या वावटळीतून बाहेर काढण्यासाठी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनी बुधवारी लोकांनी सहकार्य करावे, असे आवाहन केले. आतापर्यंतच्या हिंसाचारात मरण पावलेल्यांची संख्या ३४ झाली आहे, तसेच पोलिसांनी गोळीबाराऐवजी बंदुकीतून छऱ्यांचा मारा केल्यामुळे ९२ जणांच्या डोळ्यांना गंभीर इजा झाली आहे. त्यांना अंधत्व येण्याची भीती व्यक्त होत आहे.या पार्श्वभूमीवर १९३१ मधील हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहण्याच्या कार्यक्रमात मेहबुबा मुफ्ती म्हणाल्या की, ‘हिंसाचाराची झळ पोहोचलेल्या कुटुंबांच्या दु:खावर फुंकर घालण्यास सरकारचे प्राधान्य आहे.’ मात्र, पम्पोर आणि कुपवाडा गावांसह काश्मीर खोऱ्याच्या काही भागांत संचारबंदी कायम आहे. खोऱ्यात मोबाइल इंटरनेट आणि रेल्वे सेवा बंदच आहे. मोबाइल फोन कूपवाडा भागात बंद करण्यात आली आहे.शस्त्रे हिसकावलीपोलिसांकडील हिसकावण्यात आलेल्या ७० बंदुकांचा वापर फुटीरवादी शस्त्रे आणि दारूगोळा वाढविण्यासाठी करतील, अशी भीती आहे. दोन दिवसांपूर्वी कुलगाममधील दमहल हांजी पोरा पोलीस ठाण्यावर जमावाने हल्ला करून, सेमी आॅटोमॅटिक व आॅटोमॅटिक अशा ७० बंदुका हिसकावून नेल्या होत्या. सरकारला अपयश : अब्दुल्लाबुऱ्हान वनीच्या मृत्युमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचे नेमके आकलन करून घेण्यात मेहबुबा सरकारला अपयश आल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी केला. २००८ आणि २०१० मध्ये खोऱ्यामध्ये मोठ्या प्रमाणावर निदर्शने झाली होती. त्यांचा धडा पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टी-भाजपा युती विसरली, असे अब्दुल्ला म्हणाले. मेहबुबा मुफ्ती या राज्यात परिस्थिती सामान्य असल्याचे निलाजरेपणे सांगत आहेत, असाही आरोप त्यांनी केला. ते येथे वार्ताहरांशी बोलत होते. (वृत्तसंस्था)