शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

चित्रपटातील संधीसाठी आता आॅनलाईन आॅडिशन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2016 23:38 IST

तुम्हाला चित्रपटात काम करायची इच्छा आहे? तर मग आता आॅडिशन देण्यासाठी मुंबईला येऊन वेगवेगळ्या निर्माते आणि दिग्दर्शकांचे उंबरे झिजवण्याची गरज नाही.

मुंबई : तुम्हाला चित्रपटात काम करायची इच्छा आहे? तर मग आता आॅडिशन देण्यासाठी मुंबईला येऊन वेगवेगळ्या निर्माते आणि दिग्दर्शकांचे उंबरे झिजवण्याची गरज नाही. कारण ‘बॉम्बेकास्टिंग डॉट कॉम’ या पोर्टलने अभिनव सुविधा उपलब्ध करून दिली आहे. इच्छुकांसाठी या पोर्टलतर्फे ६ जानेवारी ते २१ जानेवारीदरम्यान आॅनलाईन आॅडिशनचे आयोजन करण्यात आले आहे. बॉम्बेकास्टिंगचे संस्थापक आणि ‘गँग आॅफ वासेपूर’सारख्या गाजलेल्या चित्रपटाचे निर्माते सुनील बोहरा यांनी सांगितले की, कलाकारांनी आपल्या अभिनयाचे रेकॉर्डिंग करून ते वेबसाईटवर अपलोड करण्याची सुविधा उपलब्ध करून देतानाच, या वेबसाईटद्वारे त्यांच्या आॅडिशन्स दिग्गज निर्माते-दिग्दर्शकांपर्यंत पोहोचविण्यात येतील.याच अनुषंगाने, ६ ते २१ जानेवारी दरम्यान एका विशेष आॅडिशन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून इच्छुक कलाकारांनी आपल्या अभिनयाचे रेकॉर्डिंग बॉम्बे कास्टिंगच्या वेसबाईटवर अपलोड करायचे आहे. या आॅडिशन्स आनंद एल. राय, हंसल मेहता, तिगमांशु धुलिया यांच्यासारख्या विख्यात दिग्दर्शकांना सादर करण्यात येणार आहेत. पहिल्या क्रमांकाच्या कलाकाराला ११ लाख रुपयांचे बक्षीस तसेच, यांच्यासोबत चित्रपटाचे कॉन्ट्रॅक्ट, तर दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकाच्या विजेत्यांना अनुक्रमे पाच लाख रुपये व दोन लाख रुपयांचे बक्षीस देण्यात येणार आहे. सर्व विजेत्यांना चित्रपट, डॉक्युमेंटरी, जाहिरातींमध्ये १०० दिवसांचे काम देण्यात येईल. इच्छुकांनी www.Bombaycasting.com   या वेबसाईवर संपर्क साधावा.