शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय शिष्टमंडळातील समावेशामुळे काँग्रेस नाराज, आता शशी थरूर स्पष्टच बोलले, म्हणाले...  
2
Mumbai Water Storage: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये फक्त १८ टक्के पाणीसाठा शिल्लक
3
IPL 2025 Playoffs Race : आता MI सह ६ संघ शर्यतीत; कुणाचा पेपर सोपा कुणाला आहे सर्वाधिक धोका?
4
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
5
IPL 2025 : गत चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स OUT! 'विराट' शक्ती प्रदर्शनासह RCB टॉपला; पण...
6
"पुतीन यांच्याशी थेट बोलणार, रशिया आणि युक्रेनमधील भीषण युद्ध थांबवणार’’, ट्रम्प यांचं मोठं विधान
7
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
8
Pune: पुण्यात १५ वर्षीय मुलीला सर्पदंश, वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू
9
तू स्वप्नातही...! राहुल द्रविडचा हिटमॅन रोहितसाठी खास मेसेज; मुंबई इंडियन्सनं शेअर केला व्हिडिओ
10
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
11
IPL 2025 : मोहीम फत्ते! 'दर्दी' चाहत्यांनी विराटसाठी व्हाइट जर्सीत केली गर्दी
12
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
13
ज्योती मल्होत्रा ​​कोण आहे? पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली झाली अटक
14
दर्यापूरचे सराफा दुकान फोडणारी आंतरराज्यीय टोळी अटकेत
15
पाच बायका, शाहबाज शरीफ यांची लव्ह स्टोरी ऐका, चुलत बहिणीशी केलं पहिलं लग्न, त्यानंतर...
16
नातेवाईकावर अंत्यसंस्कार करून आंघोळीसाठी नदीत उरतले, बाप-लेकासह तिघांचा बुडून मृत्यू
17
अलिशान स्पोर्ट्स कारवरील स्क्रॅच बघून संतापला रोहित शर्मा; भावावर असा काढला राग (VIDEO)
18
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
19
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच आईला संपवलं; इन्स्टाग्रामने उलगडलं हत्येचं गूढ
20
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा

आता सौरऊर्जेवर चालणार खादीचा चरखा

By admin | Updated: October 29, 2015 00:37 IST

सौरऊर्जेवर खादीचा चरखा चालविणारे पहिले राज्य बनण्याचा मान बहुदा गुजरात पटकावणार आहे. हा प्रयोग महाराष्ट्रातही व्हायला हवा,

दीपक भट, अहमदाबादसौरऊर्जेवर खादीचा चरखा चालविणारे पहिले राज्य बनण्याचा मान बहुदा गुजरात पटकावणार आहे. हा प्रयोग महाराष्ट्रातही व्हायला हवा, अशी सूचना लोकमत वृत्तपत्र समूहाच्या एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन आणि खासदार विजय दर्डा यांनी केली आहे.सौरऊर्जेचा वापर चरखा चालविण्यासाठी केला जाणार असल्याची माहिती गुजरातमध्ये प्रवास करताना मिळाली. हा खरोखरच अनुकरणीय पुढाकार आहे. त्यामुळे केवळ खादीचे उत्पादनच वाढणार नाही तर विणकरांना कामाचा उचित मोबदलाही मिळेल, त्याचवेळी गांधीजींचे ग्रामीण विकासाचे स्वप्नही साकार होईल, असे ते म्हणाले.खादी आणि ग्रामोद्योग आयोगाने (केव्हीआयसी) तसेच खादीला प्रोत्साहन देणाऱ्या अन्य संस्थांनीही अधिक टकळी (स्पिंडल्स) असणारा चरखा विकसित केला आहे, ज्याला सौर ऊर्जेवर चालविले जाऊ शकते. सौरऊर्जेवर खादी चरखा यशस्वीरीत्या चालवणारे गुजरात हे बहुदा पहिले राज्य बनणार आहे. त्याबाबत खादी प्रयोग समिती अहमदाबाद, उद्योग भारती ट्रस्ट गोंडल, सूरत इंजिनियरिंग विकास असोसिएशन तसेच इंडो-जर्मन टूल रुमकडून चाचण्या घेतल्या जात आहेत. केव्हीआयसीच्या सूत्रानुसार या चाचण्यांच्या निष्पत्तीसंबंधी अहवाल पुढील महिन्यात सरकारला सादर केला जाणार आहे.खा. दर्डा म्हणाले की, केव्हीआयसी तसेच अमरावतीस्थित अशासकीय संघटना गांधीग्राम ऊर्जा विकास संस्थेने वर्धेच्या महात्मा गांधी ग्रामीण औद्योगिकीकरण संस्थेसोबत मिळून खादी चरख्याच्या कताई चाकाचे (स्पीनिंग व्हिल) डिझाईन तयार केले आहे. सद्यस्थितीत सूतकताई कामगारांमध्ये बहुतांश महिला कामगारांचा समावेश आहे. सरकार त्यांना योग्य मोबदला देऊ इच्छिते. सौर खादी चरखा आणण्याचा मुख्य हेतू महिला सूतकताई कामगारांना वाढीव मोबदला देणे हा आहे.खादी संस्थांकडून मिळालेल्या आकडेवारीनुसार, संबंधित संस्थांनी दहा लाख सूतकताई कामगारांना रोजगार मिळवून दिला आहे. मात्र यातून होणारी त्यांची कमाई अतिशय तुटपुंजी आहे. एक सूतकताई कामगार चरख्यावर हातांनी आठ तास सूत कातल्यानंतर केवळ अडीचशे रुपये कमावतो. सौरऊर्जेवर आधारित खादी चरख्याद्वारे चारपट अधिक सूतकताई होऊ शकते. पारंपरिक चरख्यात खादीचे ३-८ स्पिंडल्स होतात. यातून आठ तासांत सूताचे २५ पीळ तयार होतात. याउलट सौर ऊर्जेवर चालणाऱ्या चरख्यावर ३६ स्पिंडल्स असतात. याद्वारे आठच तासांत १०० पीळ तयार केले जाऊ शकतात. उद्योग भारती ट्रस्ट १०-२४ स्पिंडल्स असलेल्या अशा १५ चरख्यांचा प्रायोगिक तत्त्वावर वापर सुरू करीत आहे. या चरख्यांची किंमत ३५ ते ४० हजार रुपयांपर्यंत आहे. गोंडलमध्ये या चरख्यांचे मूल्यमापन होणार आहे. या मूल्यमापनानंतर सौर चरख्याच्या डिझाईनमध्ये आवश्यक ते बदलही केले जाऊ शकतात.