शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
2
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
3
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
4
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
5
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
6
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
7
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
8
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
9
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
10
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
11
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
12
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
13
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
14
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
16
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
17
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
18
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
19
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
20
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?

केंद्रीय कर्मचाऱ्यांना आता सरकारी सहल

By admin | Updated: December 7, 2015 01:42 IST

लवकरच केंद्रीय कर्मचाऱ्यांना सरकारी खर्चाने आनंद लुटण्याची अपूर्व संधी लाभणार आहे. जंगलातील राहुट्यांमधील वास्तव्य, गुलमर्गच्या हिमाच्छादित पर्वतराजींमध्ये स्कीर्इंगचा आनंद लुटणे

नवी दिल्ली : लवकरच केंद्रीय कर्मचाऱ्यांना सरकारी खर्चाने आनंद लुटण्याची अपूर्व संधी लाभणार आहे. जंगलातील राहुट्यांमधील वास्तव्य, गुलमर्गच्या हिमाच्छादित पर्वतराजींमध्ये स्कीर्इंगचा आनंद लुटणे असो अथवा गिर्यारोहणासारख्या अचाट साहसी प्रयोगांचा अनुभव घेताना त्यांना स्वत:चा खिसा शाबूत राखता येईल.कर्मचाऱ्यांना चमू म्हणून काम करताना जोखीम पत्करणे शिकावे यासाठी मोदी सरकारने कार्यालयाबाहेरचा अनुभव देण्याची योजना आखली आहे. सुमारे ५० लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांना साहसी क्रीडा प्रकारांमध्ये सहभागी होता येईल. सततच्या बैठ्या कामांमुळे येणारी निष्क्रियता किंवा धोक्याची घंटा वाजवणारी स्थिती टाळण्यासाठी सरकारने या उपाययोजना हाती घेतल्या आहेत. जोखीम पत्करण्यासह चमू म्हणून सांघिकतेची भावना वृद्धिंगत व्हावी, सदैव तत्पर राहण्याची क्षमता वाढावी, कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी प्रतिसाद क्षमता वाढविण्याचा त्यामागे उद्देश असेल, असे कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाने (डीओपीटी) स्पष्ट केले.मनालीची अटलबिहारी वाजपेयी गिर्यारोहण आणि संलग्न क्रीडा संस्था, गुलमर्गची स्कीर्इंग आणि गिर्यारोहण संस्था, गोव्याची वॉस्को द गामा जलक्रीडा संस्था, नेहरू गिर्यारोहण संस्था उत्तरकाशी आदी संस्थांवर कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. पॅरासेलिंग, बलूनिंग, पॅराग्लायडिंग, जंगल सफारी, वाळवंटातील सफारी, बीच ट्रेकिंग तसेच पर्यावरणासंबंधी जागृती शिबिरांमध्ये कर्मचाऱ्यांना सहभागी होता येईल. केंद्रीय कर्मचाऱ्यांना त्यासाठी खास सुटी मंजूर केली जाणार असून २० हजार रुपयांपर्यंत खर्च सरकारकडून दिला जाईल. प्रत्येक मंत्रालय आणि विभागातील दोन अधिकाऱ्यांना सेवेतील उत्कृष्ट कार्याबद्दल अशा कार्यक्रमांचे शंभर टक्के शुल्क सरकारकडून बक्षीस म्हणून दिले जाईल. त्यांची अशा कार्यक्रमांसाठी खास नियुक्ती केली जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.