शहरं
Join us  
Trending Stories
1
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
4
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
5
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
6
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
7
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
8
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
9
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
10
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
11
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
12
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
13
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
14
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
15
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
17
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
18
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
19
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
20
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
Daily Top 2Weekly Top 5

आता लुटा दुमजली रेल्वे प्रवासाचा आनंद

By admin | Updated: April 25, 2017 00:51 IST

रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर आहे. भारतीय रेल्वे येत्या जुलैपासून ‘उदय’ एक्स्प्रेस’ (उत्कृष्ट डबल डेकर एसी यात्री एक्स्प्रेस-उदय) सुरू करणार असून

नवी दिल्ली : रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर आहे. भारतीय रेल्वे येत्या जुलैपासून ‘उदय’ एक्स्प्रेस’ (उत्कृष्ट डबल डेकर एसी यात्री एक्स्प्रेस-उदय) सुरू करणार असून, त्यामुळे प्रवाशांना थर्ड एसीहूनही कमी भाड्यात रात्रीचा आरामदायी प्रवास करता येणार आहे. अशा गाड्यांची घोषणा रेल्वे अर्थसंकल्पात करण्यात आली होती. गर्दीच्या मार्गांवर अशा गाड्या सुरू करण्याचा विचार आहे. आरामदायक खुर्च्यांनी सुसज्ज, १२० आसनी एसी डब्ब्यांत स्वयंचलित यंत्राद्वारे (व्हेंडिंग मशीन) प्रवाशांना जेवण, चहा आणि शीतपेये पुरविली जातील. उदय एक्स्प्रेस दिल्ली-लखनौ यासारख्या अधिक मागणी असलेल्या मार्गांवर धावणार असून, नियमित गाड्यांच्या थर्ड एसीच्या तुलनेत उदयचे भाडे कमी असेल. सर्व डब्यांत वायफाय स्पीकरप्रणालीयुक्त मोठ्या स्क्रीनचे एलसीडी टीव्ही असतील. या रेल्वे इतर रेल्वेंच्या तुलनेत ४० टक्के अधिक प्रवासी वाहून नेऊ शकतील. त्यामुळे अधिक गर्दीच्या मार्गावरील भार कमी होण्यास मदत होईल. रात्री धावणार असूनही या गाडीचा स्लीपर बर्थ नसेल. त्याऐवजी अनेक सुविधा देऊन प्रवास सुलभ करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. ही रेल्वे ताशी ११० कि. मी. प्रति वेगाने धावणार आहे.