शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
2
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
3
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
4
पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांबाबत सुप्रीम कोर्टात आज निकाल
5
विशेष लेख: पाकिस्तानच्या भूमिकेवरून एवढा गोंधळ, गदारोळ का?
6
चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाण सीमेजवळ स्थापन केला नवीन विभाग
7
‘ईशान्येला देशापासून वेगळे करण्याचा डाव’, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
8
अमरनाथ यात्रा ३ जुलैला सुरू होणार; १५ एप्रिलपासून नोंदणी
9
Iran War: इराणच्या युद्धात महासत्ता अमेरिकेचा ‘सेल्फ गोल’
10
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
11
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
12
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
13
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
14
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
15
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
16
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
17
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
18
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
19
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
20
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

आता सपा नेत्याच्या वक्तव्यावरून वाद

By admin | Updated: October 24, 2015 02:57 IST

उत्तर प्रदेशचे मंत्री आझम खान यांनी शुक्रवारी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य करून नवा वाद ओढवून घेतला. मोबाईल फोनमुळेच देशातील विविध भागांत मुलींवर बलात्कार होत

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशचे मंत्री आझम खान यांनी शुक्रवारी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य करून नवा वाद ओढवून घेतला. मोबाईल फोनमुळेच देशातील विविध भागांत मुलींवर बलात्कार होत आहेत, असे ते म्हणाले.अलीकडे दिल्लीत अल्पवयीन मुलींवर झालेल्या बलात्कारांच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर ते बोलत होते. अडीच वर्षांच्या चिमुकलीवर बलात्कार होतो. का? याचे कारण मोबाईल फोन आहे. इंटरनेटच्या माध्यमातून मोबाईलवर अश्लील मजकूर सहज पाहायला मिळतो. लहान लहान मुले नाही ते डाऊनलोड करून बघताना आढळतात. खेडोपाडी जाऊन पाहिले असता अल्पवयीन मुले अश्लील व्हिडिओ पाहताना दिसतात. हे अश्लील व्हिडिओ पाहूनच बलात्कारासारख्या घटना घडतात. अल्पवयीन मुली वासनांधाची शिकार ठरतात, असे आझम खान म्हणाले.तत्पूर्वी आझम खान यांनी परराष्ट्र राज्यमंत्री व्ही.के. सिंग यांच्या कुत्र्याची उपमा दिल्याबाबतच्या विधानावर सडकून टीका केली. सिंग जे काही बोलले त्यात काहीही आश्चर्य नाही. कारण ही भाजपाची संस्कृतीच आहे, अशी तिखट प्रतिक्रिया त्यांनी दिली. व्ही.के. सिंग यांच्या वक्तव्याची तुलना त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१३ मध्ये दिलेल्या एका वक्तव्याशी केली. नरेंद्र मोदी यांनी पिल्लू शब्द वापरला होता. आता याच पिल्लाचे कुत्रे झाले, असे आझम खान म्हणाले. भाजपाने मोदींना पंतप्रधानपदाचे उमेदवार जाहीर केल्यानंतर एका मुलाखतीत मोदींना गुजरात दंगलीबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. गुजरात दंगलीबाबत वाईट वाटते का? असे त्यांना विचारण्यात आले होते. यावर एखादे कुत्र्याचे पिल्लू गाडीच्या चाकाखाली येऊन मरते तेव्हाही दु:ख होते, या दंगलीत तर माणसे मेली होती, असे उत्तर मोदींनी दिले होते. (लोकमत न्यूज नेटवर्क)