शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
4
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
5
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
6
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
7
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
8
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
9
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
10
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
11
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
12
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
13
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
14
Peace Of Mind: मनावर ताबा मिळवण्यासाठी आणि जीवन समृद्ध करण्यासाठी भगवान बुद्धांनी सांगितले ९ सुवर्ण मार्ग
15
PSL 2026: "उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
16
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
17
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
18
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
19
वरुथिनी एकादशी २०२६: १० हजार वर्षांच्या तपश्चर्येचे फळ केवळ एका व्रतात! जाणून घ्या 'वरुथिनी एकादशी'चे पूजा विधी
20
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
Daily Top 2Weekly Top 5

मॅगीनंतर आता पास्ता, मॅक्रोनीही रडारवर

By admin | Updated: June 7, 2015 01:26 IST

नेस्लेच्या मॅगीवर बंदी घातल्यानंतर दुसऱ्या दिवशी शनिवारी भारतीय अन्न सुरक्षा नियामक प्राधिकरणाने (एफएसएसएआय) आता

नवी दिल्ली : नेस्लेच्या मॅगीवर बंदी घातल्यानंतर दुसऱ्या दिवशी शनिवारी भारतीय अन्न सुरक्षा नियामक प्राधिकरणाने (एफएसएसएआय) आता आपला मोर्चा इतर कंपन्यांच्या नूडल्सकडे वळविला असून, त्यांच्याही नमुन्यांची तपासणी करण्याचा निर्णय घेतला आहे. याशिवाय ब्रॅण्डेड पास्ता आणि मॅक्रोनी उत्पादनांचीही चाचणी करण्यात येईल, असे प्राधिकरणातर्फे शनिवारी सांगण्यात आले. परंतु ब्रॅण्ड अ‍ॅम्बेसडरविरुद्ध कारवाईचा मात्र तूर्तास विचार नाही. प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) युद्धवीरसिंग मलिक यांनी यासंदर्भात माहिती देताना सांगितले की, इतर ब्रॅण्डच्या नूडल्सचीही तपासणी करण्यात येणार असून नमुने गोळा करण्याचे काम सुरू झाले आहे. त्यांनी ब्रॅण्डची नावे सांगितली नसली तरी लोकप्रिय ब्रॅण्डमध्ये आयटीसीचे सनफेस्ट येपी, एचयूएलचे नोर, निसिन फूडस्चे टॉप रामेन आणि नेपाळच्या चौधरी समूहाचे वाय वाय आदींचा समावेश आहे. एफएसएसएआयकडून आपल्या उत्पादनांच्या विक्रीची परवानगी घेतलेल्या इन्स्टंट नूडल्स, मॅक्रोनी आणि पास्ताच्या सर्व ब्रॅण्डची नावे सोमवारी प्राधिकरणाकडून जाहीर केली जाणार आहेत. या ब्रॅण्डचे नमुने चाचणीसाठी गोळा केले जातील. ज्या कंपन्यांनी आपल्या उत्पादनाच्या विक्रीची परवानगी घेतली नसेल ती सर्व उत्पादने बेकायदेशीर असून त्यांच्याविरुद्ध कारवाईचा विचार केला जाईल, असेही मलिक यांनी स्पष्ट केले. एफएसएसएआयची मंजुरी नसलेली अनेक उत्पादने बाजारात विक्रीला असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. दरम्यान, मॅगीनंतर कर्नाटकने इतर कंपन्यांच्या नूडल्सची तपासणी करण्याचा निर्णय घेतला असून, त्यांच्या नमुन्यांचे परीक्षण करण्याचे आदेश दिले आहेत. मिझोरम सरकारने राज्यात नेस्ले नूडल्सच्या विक्रीवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे.(लोकमत न्यूज नेटवर्क)(वृत्तसंस्था)