शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
2
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; ६ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
3
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
4
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
5
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
6
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
7
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
8
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
9
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
10
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
11
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
12
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
13
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
14
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
15
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
16
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
17
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
18
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
19
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
20
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
Daily Top 2Weekly Top 5

आता लवकरच येणार 200 रुपयाची नोट

By admin | Updated: June 29, 2017 09:03 IST

नोटाबंदीनंतर 500 आणि 2000 रुपयांची नोट चलनात आल्यानंतर आता केंद्र सरकार लवकरच 200 रुपयांची नोटही व्यवहारात आणण्याच्या तयारीत आहे.

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 29 - नोटाबंदीनंतर 500 आणि 2000 रुपयांची नोट चलनात आल्यानंतर आता केंद्र सरकार लवकरच 200 रुपयांची नोटही व्यवहारात आणण्याच्या तयारीत आहे. भारतीय रिझर्व्ह बँककडून 200 रुपयांच्या नोटेचं छपाईकाम सुरू करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. सर्वसामान्यांचे दैनंदिन व्यवहार सुरळीत आणि सुलभ होण्याच्या हेतून 200 रुपयांची नोट आणणार असल्याचे आरबीआयकडून सांगण्यात आले आहे.  
 
काळा पैसा, बनावट नोट आणि भ्रष्टाचार संपवण्यासाठी 8 नोव्हेंबर 2016 रोजी केंद्र सरकारनं देशात नोटाबंदी निर्णय लागू केला. या निर्णयानुसार 500 व 1000 रुपयांच्या जुन्या नोटा व्यवहारातून रद्द करण्यात आल्या. यानंतर 500 व 2000 रुपयांच्या नवीन नोटा जारी करण्यात आल्या होत्या.  दरम्यान, मार्चमध्ये झालेल्या बैठकीदरम्यान आरबीआयनं 200 रुपयाची नोट व्यवहारात आणण्याचा निर्णय घेतला. 
 
नोटाबंदीनंतर सर्वसामान्यांना चलनतुटवड्याचा सामना करावा लागला होता. पण, आता 200 रुपयाची नोट व्यवहारात आल्यानंतर मोठा दिलासा मिळेल, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. ‘इकॉनॉमिक टाईम्स’ या वृत्तपत्राने दिलेल्या बातमीनुसार,  काही दिवसांपूर्वी आरबीआयने 200 रुपयाची नोट छापण्याचे आदेश दिले असून यानंतर सरकारी मुद्रणालयात नोट छापण्याच्या कामाला सुरुवातदेखील झाली आहे. जुलैपर्यंत या नोटा चलनात आणण्याचे सरकारचे उद्दीष्ट होते. पण आता या नोटा चलनात आणण्यासाठी आणखी वेळ लागेल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.