शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

केंद्राकडून रिअल इस्टेट कायद्याची अधिसूचना जारी

By admin | Updated: March 31, 2016 03:21 IST

संसदेत नुकतेच मंजूर झालेले रिअल इस्टेट (रेग्युलेशन अँड डेव्हलपमेंट) विधेयक २0१६ च्या संदर्भात केंद्र सरकारने अधिसूचना काढली आहे. त्यानुसार येत्या एक वर्षाच्या आत राज्य

नवी दिल्ली : संसदेत नुकतेच मंजूर झालेले रिअल इस्टेट (रेग्युलेशन अँड डेव्हलपमेंट) विधेयक २0१६ च्या संदर्भात केंद्र सरकारने अधिसूचना काढली आहे. त्यानुसार येत्या एक वर्षाच्या आत राज्य सरकारांना रिअल इस्टेट रेग्युलेटरी अ‍ॅथॉरिटीची नियुक्ती करावी लागेल. तसेच बांधकाम क्षेत्रातील प्रकल्प विकसकांना आपल्या गेल्या ५ वर्षांतील सर्व प्रकल्पांची माहिती अ‍ॅथॉरिटीसमोर सादर करावी लागेल. या अधिसूचनेमुळे देशातील अनेक प्रकल्प विकसक अस्वस्थ आहेत आणि सदनिका खरेदी करणाऱ्या ग्राहकांमध्येही समाधानाबरोबर संभ्रमाचे वातावरण आहे. देशात ज्या ग्राहकांनी विविध गृहबांधणी अथवा अन्य प्रकल्पांत गेल्या पाच वर्षांत पैसे गुंतवले, त्यापैकी अनेक प्रकल्प पूर्वीच पूर्ण झाले. अनेक ग्राहकांना सदनिका अथवा मिळकतींचे विकसकांकडून हस्तांतरही झाले; मात्र बुकिंग करतेवेळी जी विविध आश्वासने विकसकाने दिली, त्यांची पूर्तता न झाल्याच्या असंख्य ग्राहकांच्या तक्रारी शिल्लक असल्याचे आढळून आले आहे. नव्याने स्थापन होणाऱ्या नियामकाकडून त्या तक्रारींचे निवारण होईल की नाही, जुन्या ग्राहकांना नव्या कायद्याचा लाभ मिळेल की नाही, याबाबत अद्याप संभ्रमाचे वातावरण आहे. कॉन्फेडरेशन आॅफ अपार्टमेंट ओनर्स असोसिएशन या सदनिका ग्राहक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार सदनिकांचे हस्तांतर पूर्ण झाले असले तरी गेल्या ५ वर्षांत सुरू झालेले संपूर्ण प्रकल्प कायद्याच्या कक्षेत आले तरच ग्राहकांना त्याचा लाभ मिळू शकेल. जे प्रकल्प पूर्ण झाले आहेत आणि ज्यांचे रीतसर हस्तांतरही झाले आहे, त्याचे ग्राहक नव्या नियामकाकडे तक्रार करू शकतील की नाही, यासंबंधी अधिसूचनेत नेमक्या कोणत्या तरतुदी आहेत, त्याचे तपशील अद्याप हाती आलेले नाहीत. राज्य सरकारांतर्फे रिअल इस्टेट रेग्युलेटरी अ‍ॅथॉरिटीची नियुक्ती झाल्यानंतरच या संदर्भात अधिक स्पष्टता येऊ शकेल.(विशेष प्रतिनिधी)क्रेडाईच्या बैठकीत नाराजीचा सूर1 केंद्र सरकारची रिअल इस्टेट कायद्यासंबंधी अधिसूचना जारी झाल्यानंतर त्यातल्या विविध तरतुदींच्या चिकि त्सेसाठी, नॅशनल रिअल इस्टेट डेव्हलपमेंट कौन्सिल (नारडको) आणि कॉन्फेडरेशन आॅफ रिअल इस्टेट डेव्हलपर्स असोसिएशन आॅफ इंडिया (क्रेडाई) च्या पदाधिकाऱ्यांची एक बैठक झाली. 2 बैठकीत अधिसूचनेबाबत अस्वस्थता होती. सरकारविषयी नाराजीचा सूरही काहींनी व्यक्त केला. तथापि अधिसूचनेविषयी सकारात्मक अथवा नकारात्मक अशी कोणतीही प्रतिक्रिया या संघटनांच्या वतीने देण्यात आली नाही.