शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
3
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
4
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
5
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
6
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
7
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
8
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
9
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
10
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
11
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
12
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
13
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
14
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
15
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
16
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
17
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
18
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
19
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
Daily Top 2Weekly Top 5

केवळ पोकळ आश्वासनांनी बदल होत नाही - हुल

By admin | Updated: June 18, 2015 01:40 IST

केंद्रातील मोदी सरकार आणि दिल्लीतील केजरीवाल सरकार केवळ पोकळ आश्वासने देत सुटले आहेत. पण केवळ पोकळ आश्वासने देऊन बदल साध्य होऊ शकत नाही, अशी टीका काँगे्रस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी बुधवारी केली.

नवी दिल्ली : केंद्रातील मोदी सरकार आणि दिल्लीतील केजरीवाल सरकार केवळ पोकळ आश्वासने देत सुटले आहेत. पण केवळ पोकळ आश्वासने देऊन बदल साध्य होऊ शकत नाही, अशी टीका काँगे्रस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी बुधवारी केली. विकासाच्या नावावर गरिबांना त्यांच्या अधिकारांपासून वंचित ठेवले जात असल्याचा आरोपही त्यांनी केला.स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या आंदोलनास पाठींबा दर्शविण्यासाठी राहुल गांधी गत सहा दिवसांत दुसऱ्यांदा जंतरमंतरवर पोहोचले. यावेळी केलेल्या भाषणात त्यांनी मोदी आणि केजरीवाल सरकारला जोरदार लक्ष्य केले. हा लढा दिल्ली वा देशाच्या स्वच्छतेसाठी नाही तर तुमच्या सन्मानासाठी आहे. माझी ताकद तुम्हाला देऊन मी तुमच्यासाठी तुमच्यातला एक होऊन लढू इच्छितो. तुमच्याचसाठी नाही तर तुमच्यासकट शेतकरी, कामगार आणि देशातील सर्व दुर्बल आणि उपेक्षित लोकांसाठी मी लढू इच्छितो,असे ते म्हणाले. मोदी आणि केजरीवाल सरकारला केवळ आश्वासनांनी बदल घडेल असे वाटते. पण नुसत्या पोकळ आश्वासनांनी बदल घडत नसतो, असेही ते म्हणाले.भू संपादन विधेयकाच्या मुद्यावर मोदी सरकारला लक्ष्य करताना, केंद्रातील सरकारने विकासाच्या नावावर गरिबांना त्यांच्या अधिकारांपासून वंचित ठेवण्याचे धोरण अवलंबले असल्याचा आरोप त्यांनी केला. गरिबांना काय लाभ होणार, या प्रश्नाचे या सरकारकडे कुठलेही उत्तर नसते. आम्हाला असा विकास नको आहे, असे ते म्हणाले.