शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
2
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
3
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
4
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
5
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
6
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
7
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
8
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
9
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
10
Payal Nag : नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
11
LSG vs GT : पंतसमोर पहिला डाव जिंकला; गिलचा आनंद गगनात मावेना! 'तो' व्हिडिओ व्हायरल
12
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
13
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
14
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
15
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
16
अमेरिका-इराण चर्चा निष्फळ! पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया आली समोर; परराष्ट्र मंत्री इशाक डार म्हणाले...
17
“चंदेरी दुनियेच्या सफरीचा आनंद देणारा दैवी आवाज शांत झाला”; DCM शिंदेंकडून आशाताईंना आदरांजली
18
Asha Bhosale Songs: आशा भोसलेंची 'ही' गाणी प्रचंड गाजली! आजही ऐकली की चेहऱ्यावर हसू अन् डोळ्यांत पाणी येतं
19
आशा ताईंना सर्वात जास्त प्रिय होता 'डाळ-भात', स्वतः बनवायच्या 'हे' खास लोणचं; साध्या राहणीमानानंही जिंकली चाहत्यांची मनं
20
२० भाषा अन् १२ हजारांहून अधिक गाणी! 'असा' होता आशा भोसले यांचा संगीत विश्वातील प्रवास
Daily Top 2Weekly Top 5

श्रीनगरसह उत्तर भारताला हुडहुडी

By admin | Updated: December 22, 2016 00:58 IST

वर्ष संपायला आले असताना आणि नाताळचा सण तोंडावर असताना, हुडहुडी भरविणाऱ्या थंडीने श्रीनगरला अक्षरश: कवेत घेतले आहे

श्रीनगर : वर्ष संपायला आले असताना आणि नाताळचा सण तोंडावर असताना, हुडहुडी भरविणाऱ्या थंडीने श्रीनगरला अक्षरश: कवेत घेतले आहे. येथील तापमान उणे ६.५ वर पोहचले असून सहा वर्षातील हा नीचांक आहे. काश्मीरात सद्या ‘चिल्लई कला’चा (आगामी ४० दिवस पडणारी थंडी) अनुभव येत आहे. चिनार आणि देवदार वृक्षांनी सजलेल्या काश्मीरात थंडी प्रचंड वाढली असून निसर्गाचे नवे रुप या माध्यमातून पहायला मिळत आहे. भारताच्या सर्व उत्तरेकडील राज्यांमध्येही चांगली थंडी पडू लागली असून, त्यामुळे लोक दिवसाही स्वेटर्स, कोट व शाली पांघरून घराबाहेर पडत असल्याचे चित्र दिसत आहे. दिल्लीत बुधवारीही सकाळी गारठा आणि धुके यांचे साम्राज्य होते. धुक्यामुळे अनेक विमाने व रेल्वे सेवा विलंबाने सुरू होती. हरयाणा, पंजाब, राजस्थान, उत्तर प्रदेश, बिहार आदी राज्यांमध्येही यापेक्षा वेगळे चित्र नाही.चिनार वृक्षांवरुन हळूवार कोसळणारा बर्फ एव्हाना थंडीचा सांगावा घेऊन आला आहे. मंगळवारची रात्र गत सहा वर्षातील सर्वाधिक थंडीची होती. काश्मीर खोरे आणि लडाखमध्ये थंडीने दस्तक दिली आहे. पहलगाम आणि गुलमर्ग वगळता पूर्ण श्रीगनरमध्ये तापमान खूपच खाली गेले आहे. श्रीनगरमध्ये तापमान उणे ६.५ डिग्री सेल्सिअसवर आहे. मंगळवारी रात्री हे तापमान उणे ५.५ एवढे होते. यापूर्वी अशी कडाक्याची थंडी २७ डिसेंबर २०१० मध्ये होती. त्यावेळी तापमान उणे ६.६ डिग्री सेल्सिअस होते. त्यापूर्वी १३ डिसेंबर १९३४ मध्ये श्रीनगरमध्ये तापमान उणे १२.८ पेक्षा खाली गेले होते. या थंडीने डल लेकसह अनेक सरोवरातील पाणी गोठवले आहे. वसाहतीत पाणी पुरवठा करणाऱ्या पाईपलाईनमधील पाणीही गोठले आहे. लडाख भागातील लेहमध्येही यंदाच्या हिवाळ्यातील सर्वाधिक थंडीची नोंद करण्यात आली आहे. येथे तापमान उणे १४.९ डिग्री सेल्सिअसपर्यंत घसरले होते. हवामान खात्याच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, लेहमध्ये राज्यातील सर्वाधिक नीचांकी तापमान नोंदविले गेले. कारगिलमध्ये तापमान उणे ११.४ डिग्री सेल्सिअसपेक्षाही कमी होते. काश्मीर खोऱ्याचे प्रवेशव्दार असलेल्या काजीगुंडमध्ये यंदाच्या हिवाळ्यातील नीचांकी तापमान होते. कुपवाडात तापमान उणे ५.५ डिग्री सेल्सिअस तर पहेलगाममध्ये उणे ६.९ आणि गुलमर्गमध्ये उणे २.२ डिग्री सेल्सिअस होते. ४० दिवसांचा थंडीचा काळ ३१ जानेवारी पर्यंत असेल. त्यानंतर २० दिवसाचा ‘चिल्लई खुर्द’असतो. याला ‘लहान थंडी’ म्हणतात.