शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
2
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; ६ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
3
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
4
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
5
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
6
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
7
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
8
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
9
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
10
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
11
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
12
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
13
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
14
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
15
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
16
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
17
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
18
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
19
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
20
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
Daily Top 2Weekly Top 5

ईशान्येकडील राज्यांना ‘हाय अलर्ट’

By admin | Updated: June 11, 2015 23:51 IST

म्यानमारमधील लष्करी कारवाईचा सूड उगविण्यासाठी नॅशनल सोशालिस्ट कौन्सिल आॅफ नागालँड(खापलांग) या दहशतवादी संघटनेने मोठ्या

नवी दिल्ली : म्यानमारमधील लष्करी कारवाईचा सूड उगविण्यासाठी नॅशनल सोशालिस्ट कौन्सिल आॅफ नागालँड(खापलांग) या दहशतवादी संघटनेने मोठ्या हल्ल्याची योजना आखली असून काही बंडखोर म्यानमारमधून भारताच्या हद्दीत घुसले असल्याची गोपनीय माहिती आहे.या माहितीच्या आधारे ईशान्येकडील सर्व राज्यांना अतिसतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. एनएससीएन(के),पीएलए, उल्फा आणि नव्याने स्थापित युनायटेड नॅशनल लिबरेशन फ्रंट आॅफ साऊथ आशियासह इतर गटांचे सुमारे २० बंडखोर भारतीय हद्दीत शिरले असून मोठा हल्ला घडविण्याचे त्यांचे मनसुबे आहेत. परंतु त्यांची ही योजना हाणून पाडण्यासाठी आम्ही सज्ज आहोत,अशी माहिती केंद्र सरकारमधील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.गृहमंत्री राजनाथसिंग यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत या मुद्यावर विचारविनिमय करण्यात आला. बैठकीला संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल आणि लष्कर प्रमुख दलबीरसिंग सुहाग उपस्थित होते.बंडखोर कुठल्याही राष्ट्रीय संपत्तीला अथवा नागरिकांना लक्ष्य करू शकतात. सीमेवरील मोेरह गावात बुधवारी झालेला स्फोटही या योजनेचा भाग आहे,असे या अधिकाऱ्याने सांगितले. बैठकीत बंडखोरांच्या तळावर आणखी हल्ल्याची गरजही व्यक्त करण्यात आली. (लोकमत न्यूज नेटवर्क)