निमोणेच्या सरपंचपदी वर्षाराणी थोरात
By admin | Updated: August 27, 2015 23:45 IST
निमोणे : येथील ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी वर्षाराणी थोरात यांची व उपसरपंचपदी ऊर्मिला काळे यांची ७ विरुद्ध ५ अशा मतांनी निवड झाली.
निमोणेच्या सरपंचपदी वर्षाराणी थोरात
निमोणे : येथील ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी वर्षाराणी थोरात यांची व उपसरपंचपदी ऊर्मिला काळे यांची ७ विरुद्ध ५ अशा मतांनी निवड झाली.निमोणे येथील ग्रामपंचायतीची सवर्साधारण निवडणूक नुकतीच झाली. एका जागेवर भटके विमुक्त वर्गातील अर्ज न आल्याने ती जागा रिक्त राहिली. उर्वरित १२ जागांपैकी ५ जागांवर बिनविरोध निवड, तर उरलेल्या ७ जागांसाठी मोठी चुरशीची लढत झाली. यामध्ये दोन्ही गटांना संमिश्र यश मिळाले. सरपंचपद सर्वसाधारण महिला वर्गासाठी राखीव असल्याने मोठी चुरस होती. या वेळी कानिफनाथ ढगे, अर्जुन गव्हाणे, बेबीताई भालके, मीनाक्षी साळुंके, जिजाबाई दुर्गे, पूजा काळे, धनंजय काळे, गणेश काळे, प्रवीण दुर्गे, विजय पोटे हे ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते. या वेळी उन्मेष पोटे यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिले. त्यानंतर नवनिर्वाचित पदाधिकार्यांचा ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला. माजी सरपंच बबनराव अनुसे, उपसरपंच शशिकांत काळे, माजी सरपंच नानासाहेब काळे, पांडुरंग दुर्गे, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष डॉ. पुरुषोत्तम जगदाळे, सुखदेव काळे, रवींद्र थोरात, दिलीप हिंगे उपस्थित होते.फोटो : निमोणे येथील ग्रामपंचायतीचे नवनिर्वाचित पदाधिकारी व ग्रामस्थ.