वाहतूक विभागाच्या एनओसीऐवजी द्यावे लागणार हमीपत्र
By admin | Updated: August 11, 2015 22:11 IST
पुणे : शहरातील इमारती, मॉल, हॉटेल, रेस्टॉरेंट, चित्रपटगृहे यांना पार्किंगसाठी ना हरकत प्रमाणपत्र (एनओसी) घेण्याची आवश्यकता नसल्याचे आदेश महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी नुकतेच काढले आहेत. मात्र इमारतींचे बांधकाम चालू असेपर्यंत बांधकामाचे साहित्य रस्त्यावर येऊ देणार नाही तसेच इमारत पूर्ण झाल्यावर गाडया रस्त्यावर लावल्या जाणार नाहीत असे हमीपत्र बांधकाम व्यावसायिकने नकाशे मंजुर करण्यापुर्वी देणे बंधनकारक आहे.
वाहतूक विभागाच्या एनओसीऐवजी द्यावे लागणार हमीपत्र
पुणे : शहरातील इमारती, मॉल, हॉटेल, रेस्टॉरेंट, चित्रपटगृहे यांना पार्किंगसाठी ना हरकत प्रमाणपत्र (एनओसी) घेण्याची आवश्यकता नसल्याचे आदेश महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी नुकतेच काढले आहेत. मात्र इमारतींचे बांधकाम चालू असेपर्यंत बांधकामाचे साहित्य रस्त्यावर येऊ देणार नाही तसेच इमारत पूर्ण झाल्यावर गाडया रस्त्यावर लावल्या जाणार नाहीत असे हमीपत्र बांधकाम व्यावसायिकने नकाशे मंजुर करण्यापुर्वी देणे बंधनकारक आहे. वाहतूक विभागाकडून पार्किंगच्या एनओसी मिळण्यामध्ये अडचणी येत असल्याच्या मोठयाप्रमाणात तक्रारी महापालिकेकडे आल्या होत्या. बांधकाम विकास आराखडयानुसार (डीपी) पार्किंगची पाहणी करून त्याला परवानगी देण्याचे संपुर्ण अधिकार महापालिकेला असल्याने वाहतूक विभागाच्या एनओसी आवश्यकता नसल्याचे आदेश नुकतेच काढण्यात आले आहेत. त्याबाबतच्या सुचनाही बांधकाम विभागाला देण्यात आल्या आहेत.इमारतीचे बांधकाम सुरू असताना मात्र बांधकामाचे साहित्य कोणत्याही परिस्थितीत रस्त्यावर येणार नाही. इमारत पूर्ण झाल्यानंतर इमारतीमध्ये येणार्या गाडया रस्त्यावर येणार नाहीत याची जबाबदारी विकसकाला घ्यावी लागणार आहे. त्याबाबतचे हमीपत्र नकाशे मंजूर करण्यापूर्वी विकसकाने देणे बंधनकारक आहे.