शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

जागा नाही, जलनिस्सारण अस्थित्वातच नाही प्रशासकीय उदासिनता: विजेचे दर शेजारील राज्यांपेक्षा ३० टक्के जास्त

By admin | Updated: February 5, 2016 00:32 IST

जळगाव : उद्योगांसाठी जागा द्या जागा.. असे म्हणत उद्योजकांनी आता प्रतिसाद नाही म्हणून पाठपुरावा सोडल्याची परिस्थिती एमआयडीसीत आहे. तयार प्रस्तावांबाबत प्रगती नाही. जलनिस्सारणाची सुविधा नसणारी जळगाव एमआयडीसी एकमेव असावी असेही काही उद्योजक नाराजीने बोलत असतात. औद्योगिक क्षेत्रात जवळपास १२०० उद्योग आहेत. सहकार औद्योगिक वसाहत तसेच नजीकची एमआयडीसी मिळून जागांसाठीचे ...


जळगाव : उद्योगांसाठी जागा द्या जागा.. असे म्हणत उद्योजकांनी आता प्रतिसाद नाही म्हणून पाठपुरावा सोडल्याची परिस्थिती एमआयडीसीत आहे. तयार प्रस्तावांबाबत प्रगती नाही. जलनिस्सारणाची सुविधा नसणारी जळगाव एमआयडीसी एकमेव असावी असेही काही उद्योजक नाराजीने बोलत असतात.
औद्योगिक क्षेत्रात जवळपास १२०० उद्योग आहेत. सहकार औद्योगिक वसाहत तसेच नजीकची एमआयडीसी मिळून जागांसाठीचे सातशे ते आठशे प्रस्ताव प्रलंबित आहेत. सध्या सुरू असलेल्या उद्योजकांना विस्तार होत असल्यामुळे जागेची गजर आहे. त्यामुळे त्यांनी तीन एफएसआयची मागणी केली आहे. तेदेखील प्रलंबित आहे. एवढेच नव्हे तर संपूर्ण एमआयडीसीचाच विस्तार करावा अशीही मागणी आता वाढते आहे. त्यासाठी स्वतंत्र २५० हेक्टर जमीन मिळावी असा प्रस्ताव आहे. मात्र त्याबाबत फारशी गती नसल्याचीच प्रचिती येत असते. वाढीव एमआयडीसीत उद्योजकांना प्रोत्साहन म्हणून शासकीय दर कमी केले जावेत अशी एक मागणी आहे. पूर्वी एमआयडीसीत ७०० रुपये स्केअम मीटरने जागा मिळत होती. आता हे रेट भरमसाठ वाढविण्यात आले आहेत. जवळपास १७०० रुपयांचा प्रती स्केअर मीटर दर शासनाने केला आहे. हे उद्योजकांना परवडणारे नाही. मोठ्या उद्योगांना जागाही मोठी लागते. असे दर असल्यामुळे तेदेखील येथे येण्यास अनुत्सुक असतात.
जलनिस्सारणाचा पत्ताच नाही
एमआयडीसीत काही मोठे तर काही लहान उद्योग आहेत. सहकार औद्योगिक वसाहतीतही अनेक उद्योग आहेत. या उद्योगांमधुन बाहेर पडणारे पाणी हे बर्‍याच ठिकाणी रसायन मिश्रीत असते. त्यामुळे एमआयडीसीत सायंकाळच्या वेळी गेल्यास एक वेगळा दर्प येत असतो. अनेकांना त्याचा त्रास होतो. मात्र पोटाचा प्रश्न असल्यामुळे उद्योजकही शांत आणि कामगारही शांत अशी परिस्थिती आहे. याचे कारण दोन्ही औद्योगिक क्षेत्रात जलनिस्सारणाची सुविधाही गत ५० ते ६० वर्षात होऊ शकलेली नाही. हा उद्योगक व कामगार वर्गाच्या जीवाशी खेळ असल्याच्या प्रतिक्रीया उमटत असतात. पर्यावरण विभागही त्याकडे दुर्लक्षच करत असतो.