कोलकाता : बँक खाते नसलेल्या १५ कोटी लोकांना जनधन योजनेंतर्गत जोडल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी तीन सामाजिक सुरक्षा योजनांचे उद्घाटन करीत धडक पाऊल उचलले आहे. दररोज १ रुपया याप्रमाणे विमा संरक्षण देण्याच्या योजनेचा त्यात समावेश आहे. गरिबांना अधिकाराची गरज आहे, मदतीची नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. ‘जनधन’ योजनेंतर्गत १५ कोटी बँक खाती उघडण्यात आली असून, १५,८०० कोटी रुपये गुंतवण्यात आले आहेत. हा देश, हे सरकार आणि आमच्या बँका तुमच्या आहेत, असे मी देशातील गरिबांना सांगितले आहे. गरिबांना सहारा नको आहे. बदल हवा आहे. शक्ती हवी आहे, असेही ते म्हणाले. देशभरातील ८० ते ९० टक्के लोकांना विमा संरक्षण किंवा कोणतेही निवृत्तिवेतन नाही. जनधन योजनेंतर्गत पहिल्या सात दिवसांत ५.०५ कोटी लोकांची नोंद झाली.
‘सहारा’ नको, हवी शक्ती
By admin | Updated: May 10, 2015 03:56 IST