शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
4
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
5
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
6
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
7
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
8
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
9
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
10
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
11
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
12
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
13
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
14
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
15
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
16
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
17
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
18
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
19
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
20
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
Daily Top 2Weekly Top 5

बंदुकीने प्रश्न सुटणार नाहीत - मेहबूबा मुफ्ती

By admin | Updated: August 16, 2016 01:10 IST

बंदुकीने प्रश्न सुटणार नाही, असा संदेश हिंसाचाराच्या मार्गावर निघालेल्या काश्मीरच्या युवकांना व सुरक्षा यंत्रणांना देत काश्मीर व देशापुढील समस्या सोडवण्यासाठी माजी पंतप्रधान

श्रीनगर : बंदुकीने प्रश्न सुटणार नाही, असा संदेश हिंसाचाराच्या मार्गावर निघालेल्या काश्मीरच्या युवकांना व सुरक्षा यंत्रणांना देत काश्मीर व देशापुढील समस्या सोडवण्यासाठी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी सुरू केलेली प्रक्रिया पंतप्रधान नरेंद्र मोदी अवश्य पूर्ण करतील, असा विश्वास जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी व्यक्त केला.स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधत मेहबूबा मुफ्ती यांनी सोमवारी जनतेशी संवाद साधला. काहींना काश्मीर सतत पेटता ठेवायचा आहे. त्यामुळे नैसर्गिक सौंदर्य लाभलेल्या काश्मीरचे अफगाणिस्तान आणि सिरियात रुपांत होण्यापासून वाचवले पाहिजे, अशी भावूक साद हिंसेत समाविष्ट झालेल्या तरुणांना मेहबूबा यांनी घातली. हिज्बुल मुजाहिदीन या संघटनेचा अतिरेकी बुरहान वाणीला मारल्यानंतर राज्यात महिनाभर अशांतता होती. तरीही भारतासारख्या लोकशाही असलेल्या देशात प्रत्येक समस्या सोडवण्यासाठी संवाद सुरू राहतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.बंदुकीने कोणत्याही समस्या सुटणार नाहीत. राज्यातील समस्यांचे समाधान करण्यासाठी अटलबिहारी वाजपेयी यांनी सुरू केलेली प्रक्रिया पंतप्रधान नरेंद्र मोदी अवश्य पूर्ण करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. जम्मू-काश्मीरकडून विशेष राज्याचा दर्जा काढून घेण्यासाठी वाईटरित्या प्रचार केला जात आहे. मात्र राज्यात शांतता प्रस्थापित करण्यासाठी अनेक चांगल्या योजना आखल्या आहेत. त्या योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी वेळ द्यावा, अशीही विनंती त्यांनी केली. समस्या आणि तक्रारींवर पर्याय शोधण्यासाठी ‘संवाद’ हा एकमेव पर्याय आहे. जम्मू काश्मीरमधील नागरिक वाईट नाही आणि देशही वाईट नाही, असेही त्यांनी आवर्जून नमूद केले. (प्रतिनिधी)