शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
3
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
4
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
5
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
6
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
7
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
8
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
9
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
10
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
11
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
12
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
13
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
14
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
15
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
16
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
17
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
18
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
19
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
Daily Top 2Weekly Top 5

आनंदाला पारावार रहात नाही... दिलीप दहाड: वहनाचे होते स्वागत

By admin | Updated: November 15, 2015 21:12 IST

जळगाव : दिवाळीपेक्षा वहन घरी कधी येणार याची अतिशय आतुरतेने कुटुंबिय वाट पहात असतात अशी भावना सुयोग कॉलनीतील रहिवासी दिलीप दहाड यांनी व्यक्त केली.

जळगाव : दिवाळीपेक्षा वहन घरी कधी येणार याची अतिशय आतुरतेने कुटुंबिय वाट पहात असतात अशी भावना सुयोग कॉलनीतील रहिवासी दिलीप दहाड यांनी व्यक्त केली.
रविवारी सिंहाचे वहन होते. हे वहन सुयोग कॉलनीत येणार म्हणून परिसरात आनंदाचे वातावरण होते. या कॉलनीतील रहिवासी दिलीप दहाड यांच्याकडे या कॉलनीतील रहिवासानंतर १५ वर्षांपासून वहन येत असते. या संदर्भात त्यांच्याशी संवाद साधला असता ते म्हणाले, दिवाळीची जशी उत्सुकता असते त्यापेक्षा अधिक उत्सुकता आमच्या कुटुंबियांना वहन कधी येणार म्हणून असते. त्यापूर्वी आम्ही शनिपेठेत रहात होतो. तेथे वडिल, आजोबा यांच्या काळातही वहन येत असे. वहन येणार म्हणून घरावर, परिसरात लायटिंग करणे, रांगोळ्या काढणे असे कुटुंबिय उत्साहाने करत असतात. वृद्ध-आई वडिलांना तर यातून अतिशय आनंद मिळतो. आमचे एकत्र कुटंुब. चार भाऊही बरोबर असतात. त्यामुळे सर्वांचाच तयारील हातभार लागतो. या निमित्ताने सर्व नातेवाईक एकत्र येतात. तसेच कॉलनीतील नागरिकांनाही याची उत्सुकता असते. तेदेखील घरासमोर रांगोळ्या गाढून स्वागत करतात. आरती देतात. पानसुपारीचा कार्यक्रम, भारूडाचा कार्यक्रम तर अतिशय रंगत आणतो. पान सुपारीच्या कार्यक्रमासाठी प्रत्यक्ष ह.भ.प. मंगेश महाराज व अन्य येतात. त्यांच्या स्वागतासाठी सारे कुटुंबिय पुढे सरसावतात. अतिशय आनंदाचा असा तो क्षण असतो. अतिशय भक्तीमय असे वातावरण या निमित्ताने होते. संतांचे पाय परिसरास लागल्याचे मोठे समाधान परिवारास मिळते.
----
पासपोर्ट फोटो