शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

यापुढे युतीचे सरकार नकोच!

By admin | Updated: October 6, 2014 04:45 IST

महाराष्ट्रापुढील समस्यांचे कारण युती-आघाड्यांचे सरकार हेच असून, युतीच्या चक्रातून राज्याला सोडवा आणि भाजपला पूर्ण बहुमत द्या,

सांगली/कोल्हापूर : महाराष्ट्रापुढील समस्यांचे कारण युती-आघाड्यांचे सरकार हेच असून, युतीच्या चक्रातून राज्याला सोडवा आणि भाजपला पूर्ण बहुमत द्या, असे आवाहन करत बाळासाहेब ठाकरेंप्रती आदर आणि श्रद्धा असल्यानेच त्यांच्या पश्चात होणाऱ्या या निवडणुकीत शिवसेनेवर काहीही बोलणार नाही, असे स्पष्टीकरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी दिले. शरद पवारांनी आमच्या शिवभक्तीवर शंका घेऊ नये, त्यांच्यात शिवरायांचे गुण येणे अशक्य आहे, असा हल्लाही मोदी यांनी चढवला.तासगाव (जि. सांगली) आणि कोल्हपूर येथील प्रचारसभेत ते बोलत होते. बाळासाहेबांनी अनेक अडचणीवर मात करत शिवसेना वाढवली. त्यांच्याबद्दल आदर असल्यानेच शिवसेनेवर काहीही न बोलणे हे माझे कर्तव्य आहे, असे सांगत मोदींनी महायुती तुटल्यानंतर शिवसेनेकडे जाणारी सहानुभूती वळवण्याचा प्रयत्न केला. राष्ट्रवादीचा बालेकिल्ला समजला जाणाऱ्या तासगावात मोदींनी राष्ट्रवादी आणि शरद पवारांना लक्ष्य केले. ते म्हणाले की, राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून त्यांच्या घड्याळातील काटे हललेले नाहीत, हे महाराष्ट्राचे भविष्य कसे ठरवणार? पवारांना इतिहासाचे ज्ञान नाही. मुंबईच्या विमानतळाला आणि व्हिक्टोरिया टर्मिनसला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव वाजपेयी सरकारनेच दिले आहे. आम्ही सुरतमध्ये बारामतीपेक्षा मोठा शिवरायांचा पुतळा उभा केला आहे. त्यामुळे पवारांनी आमच्या शिवभक्तीवर शंका घेऊ नये. ते अनेक वर्षे मुख्यमंत्री होते, नंतर केंद्रीय कृषीमंत्री होते. शिवाजी महाराजांकडून प्रेरणा घेऊन पवारांनी जलसंवर्धन केले असते, तर शेतकऱ्यांवर आत्महत्यांची वेळ आली नसती. साखर कारखान्यांना त्यांनी राजकारणाचा अड्डा बनवला आहे.गुजरात हा आजही महाराष्ट्राचा छोटा भाऊ आहे. महाराष्ट्राला नर्मदा प्रकल्पातून चारशे कोटीची वीज गुजरात देणार आहे. शीतपेयांमध्ये केवळ पाच टक्के फळांचा रस घातला, तरी भारतातील फळ उत्पादकांना मोठा फायदा होईल. तशी विनंती अमेरिकेतील शीतपेय कंपन्यांना केली आहे. प्रयोगशाळेत त्यावर संशोधन करण्याची ग्वाही त्या कंपन्यांनी दिली आहे. जपानने भारतात दोन लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याचे आश्वासन दिले आहे. राज्याला स्थिरता आणि गती देण्यासाठी भाजपला पूर्ण बहुमत द्या, असे आवाहनही मोदी यांनी केले.