शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; या खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी आंदोलनांवरून नितीश कुमार यांचे मोदींवर टीकास्त्र

By admin | Updated: June 12, 2017 15:59 IST

राजकीय वर्तुळामध्ये बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि भाजपा यांच्यात जवळीक होत असल्याची चर्चा असतानाच आज नितीश कुमार यांनी

ऑनलाइन लोकमत
पाटणा, दि. 12 - राजकीय वर्तुळामध्ये  बिहारचे मुख्यमंत्री  नितीश कुमार आणि भाजपा यांच्यात जवळीक होत असल्याची चर्चा असतानाच आज नितीश कुमार यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. देशाच्या वेगवेगळ्या भागात सुरू झालेल्या शेतकरी आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांसाठी राष्ट्रीय धोरण बनवण्यात अपयशी ठरलेल्या मोदी सरकारवर नितीश कुमार यांनी टीकास्र सोडले आहे. तसेच हिंमत असेल तर बिहार आणि उत्तर प्रदेशमध्ये तात्काळ निवडणुका घेण्याचे आव्हानही त्यांनी दिले.  आज बऱ्याच दिवसांनंतर नितीश कुमार यांनी मोदींना थेट लक्ष्य केले. ते म्हणाले, "2014 साली झालेल्या निवडणुकीच्या आधी भाजपाने शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत मोठमोठी आश्वासने दिली  होती. तेव्हा मोदी पंतप्रधानपदाचे उमेदवार होते आणि ते आश्वासने देत सुटले होते. तसेच भाजपाच्या जाहीरनाम्यामध्ये सुद्धा या आश्वासनांचा समावेश करण्यात आला होता."  शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर राष्ट्रीय धोरण ठरवण्यात अपयशी ठरल्याने नितीश यांनी मोदींवर टीका केली. शेतकऱ्यांच्या उत्पादनाचे मूल्य सर्वप्रथम निश्चित झाले पाहिजे. मंदासोरला झालेला गोळीबार किंवा महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या आंदोलनासारखी घटना झाल्यावर कर्जमाफीची घोषणा करणे हा वरवरचा उपाय आहे. त्यातून शेतकऱी आणि शेतीवरील संकट दूर होणार नाही, असे नितीश कुमार म्हणाले.  यावेळी महात्मा गांधी यांच्याबाबत अनुद्गार काढणारे भाजपाध्यक्ष अमित शहा यांच्यावर नितीश कुमार यांनी टीका केली. तसेच शेतीची समस्या सोडवण्यासाठी योगा करण्याचा सल्ला देणारे केंद्रीय कृषिमंत्री राधामोहन सिंह यांचीही त्यांनी खिल्ली उडवली.  गेल्या काही दिवसांपासून बिहारमध्ये निवडणुका घेण्याच्या पुड्या सोडणाऱ्यांनाही त्यांनी रोखठोक इशारा दिला. मोदींमध्ये हिंमत असेल तर त्यांनी आताचा बिहार आणि उत्तर प्रदेशात निवडणुका घ्याव्यात असे आव्हान त्यांनी दिले.