खेळीमेळीत बालकांच्या निरागस हास्याची मैफल
By admin | Updated: August 3, 2015 22:26 IST
-‘जॉन्सन्स’ प्रस्तुत लोकमत सुदृढ बालक शिबिर, गोवा मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलचे विशेष सहकार्य
खेळीमेळीत बालकांच्या निरागस हास्याची मैफल
-‘जॉन्सन्स’ प्रस्तुत लोकमत सुदृढ बालक शिबिर, गोवा मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलचे विशेष सहकार्य-पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद- बाळाच्या संगोपनाविषयी तज्ज्ञ डॉक्टरांकडून मार्गदर्शन खेळीमेळीच्या वातावरणात पार पडले सुदृढ बालक शिबिरपणजी : बालगोपाळांचे निरागस हास्य, स्वत:च्याच जगातील मदमस्ती आणि बागेत फुलपाखरे विहार करावीत तशी ऐटीत मांडवीशेजारी कला आणि संस्कृती खात्याच्या सभागृहात अलवार पावसाळी वातावरणात आपल्या पाल्यांच्या विश्वासार्ह बाहूत खेळणारी बागडणारी मुले रविवारी सुदृढ बालक शिबिरात दिसत होती.बाळाचे आरोग्य आणि पालनपोषण यासंदर्भात जागृतीसाठी आयोजिलेल्या सुदृढ बालक शिबिरास रविवारी सु?ी असून देखील उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. ‘लोकमत’तर्फे जॉन्सन्स बेबी व गोवा मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल यांच्या विशेष सहकार्याने हे शिबिर घेण्यात आले.कला आणि संस्कृती संचालनालयाच्या बहुउद्देशीय सभागृहात शिबिर झाले. शिबिराचे उद्घाटन गोवा वैद्यकीय महाविद्यालयाचे डीन डॉ. प्रदीप नाईक यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी जॉन्सन्स बेबीचे व्यवसाय व्यवस्थापक भूपेश मालाडकर, डॉ. अँनेली डिलिमा, डॉ. प्रियंका आमोणकर, डॉ. रिश्वा केणी, लोकमतचे महाव्यवस्थापक संदीप गुप्ते, जॉन्सन्स अँण्ड जॉन्सन्सचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर थोरबोले, सागर थोरात व अरुण केणी उपस्थित होते. डॉ. रिश्वा केणी यांनी ‘स्तनपान व नोकरदार महिला’ या विषयावर पालकांना मार्गदर्शन केले. त्या म्हणाल्या की आईचे दूध बाळासाठी पौष्टिक असते. अनेक प्रकारच्या रोगांपासून रक्षण करण्याची क्षमता आईच्या दुधात असते. त्यामुळे मुलांना प्रथम सहा महिने केवळ स्तनपान करणे आवश्यक आहे. महिला कार्यालयात काम करत असल्यास त्यांच्यासाठी स्वतंत्र स्तनपान खोली असणे आवश्यक आहे. जेणेकरून मातेला आपल्या मुलासोबत आरामदायीपणे काही वेळ घालवता येईल. मूल सुदृढ असल्यास भविष्यात समाजही सुदृढ होतो. डॉ. प्रियंका आमोणकर यांनी ‘स्तनपानाचे फायदे’ या विषयावर मार्गदर्शन केले. त्या म्हणाल्या की मूल जन्मल्यानंतर त्याला अध्र्या तासाच्या आत आईचे दूध मिळणे आवश्यक आहे. पहिल्या एक ते सहा महिन्यांत मुलाला आईचे दूध अत्यंत गरजेचे असते. त्यानंतर आई मुलासाठी इतर पूरक आहार देण्यास सुरू करू शकते. या पूरक आहारात भात, डाळ, रागी, गहू अशा धान्यांचा समावेश होतो. आईने बाळाला बाटलीतून दूध पाजणे शक्यतो टाळावे; कारण ते बाळाच्या आरोग्याच्या दृष्टीने घातक असू शकते. आईने स्तनपानावेळी शारीरिक स्वच्छतेकडे कटाक्षाने लक्ष द्यावे. गोव्यात 50 टक्के माता बाळाला पहिल्या तीन महिन्यांत स्तनपान करत नाहीत, हे मुलांच्या आरोग्यासाठी घातक आहे. बाळाचे डोळे, त्वचा आणि केस यांच्या गरजांकडे विशेष लक्ष देऊन सुरक्षित, सौम्य आणि परिणामकारक अशी तिहेरी लाभयुक्त जॉन्सन्स बेबीची उत्पादने पालकांचा विश्वास टिकवून आहेत. बाळाच्या जन्माच्या पहिल्या दिवसापासून पालकांनी आपल्या बाळाला सर्व संकटांपासून रक्षण करण्याचे वचन दिलेले असते. त्या वचनपूर्ततेसाठी ‘जॉन्सन्स’ सर्वर्शेष्ठ उत्पादनांसह सदैव तत्पर आहे. वैद्यकीय परीक्षणातून सिद्ध झालेली ‘जॉन्सन्स बेबी’ची सर्व उत्पादने बाळाच्या अत्यंत नाजूक त्वचेला सहन होतील अशीच तयार करण्यात आलेली आहेत. (चौकट) डॉक्टरांनी केलेल्या मार्गदर्शनाला आधारून पालकांना काही प्रश्न विचारण्यात आले. प्रश्नांची अचूक उत्तरे देणार्या पालकांना जॉन्सन्स अँण्ड जॉन्सन्सतर्फे भेटवस्तू देण्यात आल्या. तेजल पाटील, अदिती प्रभू, मेघर्शी परब, सेजल मांद्रेकर, सोनिया गायतोंडे, मैथिली भोबे व नेहा गोवेकर या पालकांनी अचूक उत्तरे दिली. हे शिबिर 0 ते 1, 1 ते 3 व 3 ते 5 वर्षे अशा तीन वयोगटातील मुलांसाठी होते. तज्ज्ञ डॉक्टरांकडून बाळांची तपासणी करण्यात आली. त्याचप्रमाणे त्यांना सहभागी झाल्याबद्दलचे प्रमाणपत्रे आणि ‘जॉन्सन्स बेबी कीट’ देण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. आरती दिनकर यांनी केले. (चौकट) निरागस मुलांच्या हास्याने आणि किलबिलाटाने सभागृह भरून गेले होते. मुलांच्या मनोरंजनासाठी छोटा भीम आणि छुटकी या काटरून्सचे मुखवटे घातलेल्या माणसांनी मुलांचे चांगलेच मनोरंजन केले. या काटरून्सबरोबर छायाचित्रे काढण्यासाठी मुलांबरोबर पालकही उत्सुक दिसत होते. तसेच छोटा भीम, छुटकी, स्पायडरमॅन, मिकी माउस यांच्या कटआउटसोबत पालकांनी मुलांसमवेत छायाचित्रे काढण्याचा आनंद लुटला. (प्रतिक्रिया- पालक)नेहा गोवेकर, वागातोर :- डॉ. केणी यांनी दिलेले व्याख्यान अत्यंत फायदेशीर होते. बाटलीतून दूध पाजल्यास ते बाळासाठी घातक होऊ शकते, असे तज्ज्ञ डॉक्टरांनी सांगितल्यापासून बाटलीचा उपयोग करणे टाळले आहे. लोकमत आणि जॉन्सन्स यांचा हा उपक्रम अत्यंत स्तुत्य आहे. ‘लोकमत’च्या प्रत्येक उपक्रमात सहकार्य करण्याची माझी नेहमीच तयारी आहे. सेजल मांद्रेकर, चोडण :- बहुतेक मातांना माहीत नसते की मुलांचे संगोपन कशा पद्धतीने करावे. ‘लोकमत’तर्फे आयोजित केलेल्या शिबिरामुळे जागृती झाली आणि या शिबिरात सहभागी झालेल्या प्रत्येक आईला स्तनपानाचे महत्त्व लक्षात आले. डॉ. नूतन बिचोलकर, म्हापसा:- लोकमतने राबविलेला या उपक्रमामुळे महिलांना मुलांच्या संगोपनाविषयी महत्त्वपूर्ण माहिती मिळाली. शिबिराचे आयोजन योग्य पद्धतीने करण्यात आले होते. चांगले नियोजन, पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद, मुलांचे मनोरंजन झालेले या वेळी पाहायला मिळाले. (फोटो आहे)