शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
2
Latest Marathi News LIVE: आशा भोसले यांच्या अंत्ययात्रेला सुरुवात; शिवाजी पार्क स्मशानभूमीत होणार अंत्यसंस्कार
3
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
4
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
5
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
6
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
7
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
8
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
9
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
10
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
11
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
12
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
13
IPL 2026: बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक! 
14
'एक अब्ज डॉलर आणि लग्नासाठी एक सुंदर तरुणी द्या, अन्यथा...', या देशाच्या लष्कर प्रमुखाची तुर्कीला धमकी
15
"हृदयात काबा आणि डोळ्यांत मदिना..."; कोण आहेत सभांमध्ये गाणे गाणाऱ्या TMC खासदार सायनी घोष?
16
भावनांचा बांध फुटला! आशा भोसले यांच्या अंत्यदर्शनावेळी नात जनाई भावुक, तब्बूने केलं सांत्वन
17
घराची सफाई करताना सापडलं 'सर्वात सुंदर' नाणं; १.३७ कोटी रुपयांना झाली विक्री, काय आहे खास?
18
VIDEO: लाडक्या 'आशाताईं'ना शेवटचा निरोप देताना सचिन तेंडुलकरला अश्रू अनावर
19
कागदावर २५ हजार सॅलरी अन् प्रत्यक्षात १५००० देतात...; कंपन्यांकडून शोषण, कर्मचारी भडकले
20
IPLमध्ये भाऊबंदकी, पांड्या बंधूंमध्ये बेबनाव? MI Vs RCB लढतीत दिसलं असं दृश्य, चाहत्यांना धक्का
Daily Top 2Weekly Top 5

एनआयए हेडलीच्या पत्नीची चौकशी करणार?

By admin | Updated: November 30, 2015 01:02 IST

डेव्हिड हेडलीच्या लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेसोबत असलेल्या संबंधांची माहिती प्राप्त करता यावी यासाठी त्याची पत्नी फैजा ओताल्हा हिचा जबाब नोंदविण्याची परवानगी देण्यात यावी

नवी दिल्ली : डेव्हिड हेडलीच्या लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेसोबत असलेल्या संबंधांची माहिती प्राप्त करता यावी यासाठी त्याची पत्नी फैजा ओताल्हा हिचा जबाब नोंदविण्याची परवानगी देण्यात यावी, अशी नवी विनंती राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) मोरोक्को सरकारला केली आहे. फैजा ही हेडलीपासून विभक्त झाली आहे. तिचे जबाब नोंदविल्याने २६/११ च्या मुंबई हल्ल्यात पाकिस्तान सरकारमधील अधिकाऱ्यांनी बजावलेल्या भूमिकेचा पर्दाफाश होऊ शकतो, असा एनआयएला विश्वास आहे.याआधी एनआयएने २०१२ मध्ये पाठविलेल्या अशाच एका विनंती पत्रावरून मोरोक्कोच्या अधिकाऱ्यांनी फैजाचा जबाब पाठविला होता. फैजाचा हा जबाब मोरोक्कोच्या तपास संस्थेने नोंदविला होता. या जबाबात एनआयएच्या अनेक चिंतांचा समावेश करण्यात आला आहे. एनआयएने २००९ मध्ये भारतात हेडलीच्या कारवायांच्या तपासासाठी गुन्हा दाखल केला होता. फैजा ओताल्हा हिची व्यक्तिगतरीत्या चौकशी करण्याची परवानगी मिळावी, अशी विनंती करणारे पत्र एनआयएने मोरोक्कोच्या अधिकाऱ्यांना पाठविले आहे. पाकिस्तानी लष्कराचे दोन मेजर आणि दहशतवादी हाफीज सईद आणि जकीऊर रहमान याची मुंबई हल्ल्यातील भूमिका निश्चित करणे हा यामागचा हेतू आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)ही ताजी विनंती फ्रान्समध्ये केलेल्या भाषांतरासह पाठविण्यात आली आहे. कारण मोरोक्कोच्या अधिकाऱ्यांनी दस्तऐवजांच्या भाषांतराकडे लक्ष वेधत जुने विनंतीपत्र परत पाठविले होते. विनंती पत्राचा मजकूर भाषांतरित करून पाठविणे हा त्या देशाचा नियम आहे. (वृत्तसंस्था)