शहरं
Join us  
Trending Stories
1
"राज्यात मराठीच सक्तीची, पण..."; त्रिभाषा सूत्रावरून भाजपाने स्पष्ट केली भूमिका
2
कुठल्याही वादापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज ठाकरेंचे संकेत; ६ जुलैला ठाकरे बंधू एकत्र येणार?
3
आयजीच्या जिवावर बायजी उदार...! ज्या रेअर मेटलवर चीनने बंदी आणलीय ते तो म्यानमारमधून आयात करतो
4
'पाणी सोडणार नाही, जे करायचे ते करा...', युद्धाची धमकी देणाऱ्या भुट्टोला भारताचे एका ओळीत उत्तर
5
'रोमान्स' पडला महागात! ४ मुलांच्या आईसोबत पकडलेल्या प्रियकराला गावकऱ्यांनी दिली धक्कादायक शिक्षा
6
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
7
गुजरातमध्ये आपला झटका! एक आमदार वाढत नाही तोच दुसरा सोडून गेला; मकवाना यांचा राजीनामा
8
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
9
दुचाकी वाहनांवर टोल आकारण्याचा कोणताही प्रस्ताव नाही; नितीन गडकरी यांचे स्पष्टीकरण
10
संयुक्त निवेदनावर स्वाक्षरीस नकार, राजनाथ सिंहांनी चीन, पाकिस्तानचा तो कुटील डाव पाडला हाणून, अशी आहे Inside story 
11
नौसेनेतील अधिकाऱ्याला पैशांची होती गरज, पाकिस्तानच्या आयएसआय एजंटने संपर्क साधला, देशासोबत गद्दारी केली
12
MNS Morcha: मोर्चाला कोण येणार नाही हेही मला बघायचंय; राज ठाकरेंची हिंदी सक्तीविरोधात भव्य मोर्चाची घोषणा
13
११ लाख देऊन आजीने घेतला फेसबुकवरुन भाऊ, पुढे जे घडलं ते धक्कादायक...!
14
२४ तास नव्हे, अवघ्या 'इतक्या' मिनिटांचा असतो अवकाशातील दिवस! किती वेळा दिसतो सूर्योदय?
15
स्नॅक्स बनवणारी कंपनी देणार एकावर एक फ्री शेअर! तुमच्या पोर्टफोलिओमध्ये आहे का? का घेतला निर्णय?
16
Air India Plane Crash: ब्लॅक बॉक्सच्या तपासात यश, डेटा झाला डाउनलोड; अपघाताचे कारण कधी समोर येणार?
17
चीन जगात खळबळ उडवणार! डासांसारखा दिसणारा ड्रोन आणणार, वाचा सविस्तर
18
नोकरीच्या पहिल्याच दिवशी दिला राजीनामा, कारण ऐकून HR भडकली, सोशल मीडियावर चॅट व्हायरल केली
19
'गुगल ताण देतो, देव ताण दूर करतो!' IIT चे बॅचमेट सुंदर पिचाई आणि गौरांग दास यांच्या भेटीत काय घडलं?

एनआयएकडून इसिसचे दोघे अटकेत

By admin | Updated: July 13, 2016 02:44 IST

राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) मंगळवारी इसिसच्या कथित हैदराबाद मॉड्युलच्या प्रमुखाला त्याच्या सहकाऱ्यासह अटक केली आहे

हैदराबाद : राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) मंगळवारी इसिसच्या कथित हैदराबाद मॉड्युलच्या प्रमुखाला त्याच्या सहकाऱ्यासह अटक केली आहे. एनआयएने २९ जून रोजी या मॉड्युलचा भंडाफोड केला होता. तेलंगणातील गुप्तचर विभागाने ही माहिती दिली. इसिसच्या हैदराबाद मॉड्युलचा प्रमुख यासिर नियामतुल्ला आणि त्याचा सहकारी अताउल्ला रहमान यांना एनआयएने अटक केली आहे. रहमान हा या मॉड्युलसाठी पैसा एकत्रित करीत होता, असे सांगितले जात आहे. अतिरेकी संघटनेशी संबंध असल्याच्या संशयावरून २९ जून रोजी एनआयएने शहरातून पाच जणांना अटक केली होती. या पूर्वी अटक करण्यात आलेल्यांत मोहम्मद इब्राहिम, हबीब मोहम्मद, मोहम्मद इलयास यजदानी, अब्दुल्ला बिन अहमद अल अमुदी आणि मुजफ्फर हुसैन रिजवान यांचा समावेश आहे. एनआयएने न्यायालयात दाखल केलेल्या अहवालात म्हटले आहे की, या पाचही आरोपींनी अतिरेकी हल्ले करण्यासाठी हत्यारे आणि स्फोटक साहित्य जमा केले होते. हे सर्व इसिसच्या संपर्कात होते. दरम्यान, तपास संस्थेला असा संशय आहे की, इराक अथवा सीरियातून एक म्होरक्या येथील तरुणांना सूचना देत आहे. (वृत्तसंस्था)