माझी प्रत्येक हालचाल वृत्तपत्रांसाठी बातमी - खडसे
By admin | Updated: February 8, 2015 00:19 IST
भुसावळ (जि. जळगाव) : माझी प्रत्येक हालचाल वृत्तपत्रांसाठी बातमी असते अर्थात नाथाभाऊ नोंद घेण्यासारखा माणूस आहे, अशी जोरदार टोलेबाजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी लेवा पाटीदार समाजाच्या महासंमेलनात केली.हल्ली मी कुठल्या बैठकीला गेलो नाही की माझी बैठकीला दांडी असे वृत्त हमखास येते़ मी खाली बसलो वा उठलो तरी आजारी असलो तरी ...
माझी प्रत्येक हालचाल वृत्तपत्रांसाठी बातमी - खडसे
भुसावळ (जि. जळगाव) : माझी प्रत्येक हालचाल वृत्तपत्रांसाठी बातमी असते अर्थात नाथाभाऊ नोंद घेण्यासारखा माणूस आहे, अशी जोरदार टोलेबाजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी लेवा पाटीदार समाजाच्या महासंमेलनात केली.हल्ली मी कुठल्या बैठकीला गेलो नाही की माझी बैठकीला दांडी असे वृत्त हमखास येते़ मी खाली बसलो वा उठलो तरी आजारी असलो तरी ती वृत्तपत्रांसाठी बातमी ठरते. एखाद्या मंत्र्याने दांडी मारली तरी चालते मात्र त्यांच्याबद्दल काही छापून येत नाही, अशी स्पष्टोक्तीही त्यांनी दिली़ जे पन्नास वर्षांत काँग्रेस करू शकली नाही ते शंभर दिवसात नाथाभाऊंनी ते करावे, अशी अपेक्षा आमच्या टीकाकरांना असल्याचेही ते म्हणाले. युती शासनाच्या शंभर दिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमास उपस्थितीबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी कळवले होते मात्र भुसावळात येण्याचा पूर्वनियोजित कार्यक्रम होता. आपण त्यांना उपस्थित राहू शकत नसल्याचे कळवले होते. मात्र प्रसिद्धी माध्यमांसाठी तीही दांडीची बातमी असेल, असे ते म्हणाले.-----------भाकड गायी दत्तक घेणारभाकड गाईंची कत्तल रोखण्यासाठी शासन त्यांना दत्तक घेणार आहे, अशी ग्वाही खडसे यांनी दिली़ गाईंच्या संवर्धनासाठी गो-धाम योजना सुरू करणार असल्याचे त्यांनी सांगितले.