शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
3
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
4
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
5
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
6
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
7
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
8
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
9
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
10
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
11
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
12
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
13
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
14
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
15
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
16
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
17
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
18
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
19
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
20
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे

कोरोना लसीबाबत अफवा पसरविणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई होणार, केंद्राचा आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2021 19:05 IST

Corona vaccine updates: देशात गेल्या १६ जानेवारीपासून कोरोना लसीकरणाच्या मोहिमेला सुरुवात झाली आहे.

ठळक मुद्दे'अफवा आणि खोट्या बातम्या थांबविण्यासाठी अशा लोकांवर कारवाई करणे आवश्यक आहे.'

नवी  दिल्ली : कोरोना व्हायरसचा प्रतिबंध करण्यासाठी देशभरात लसीकरण मोहीम सुरू झाली आहे. दरम्यान, केंद्र सरकारने स्वदेशी लसीबाबत अफवा पसरविण्यासंबंधी (Spreading Rumor's About Vaccines) इशारा दिला आहे. 

केंद्रीय गृहसचिव अजय भल्ला यांनी यासंदर्भात राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना पत्र लिहिले आहे. यामध्ये राज्यांना सांगण्यात आले आहे की, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम आणि आयपीसीच्या तरतुदीनुसार अशा लोकांवर कारवाई करण्यात येईल, जे कोरोना लसीकरणाबद्दल कोणत्याही प्रकारची अफवा पसरवताना आढळून येतील.

केंद्रीय गृहसचिवांनी आपल्या पत्राद्वारे म्हटले आहे की, अफवा आणि खोट्या बातम्या थांबविण्यासाठी अशा लोकांवर कारवाई करणे आवश्यक आहे. तसेच, वास्तविक तथ्यांच्या आधारे विश्वसनीय माहिती प्रसारित करण्याचा सल्ला राज्यांना देण्यात आला आहे. अफवा पसरविणार्‍या संस्था आणि व्यक्तींविरूद्ध कायदेशीर तरतुदींनुसार दंडात्मक कारवाई केली जाऊ शकते.

याचबरोबर, सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया आणि भारत बायोटेक लिमिटेडद्वारे विकसित आणि निर्मित केलेल्या दोन्ही लस सुरक्षित आणि रोगप्रतिकारक असल्याचे देशातील नॅशनल रेग्युलेटरी अॅथोरिटीने म्हटले आहे, असे अजय भल्ला यांनी म्हटले आहे.

दरम्यान, देशात गेल्या १६ जानेवारीपासून कोरोना लसीकरणाच्या मोहिमेला सुरुवात झाली आहे. लसीकरणानंतर सोशल मीडियावर काही लोकांच्या मृत्यूबद्दल अनेक अफवा समोर आल्या आहेत. मात्र, हे मृत्यू लसीशी संबंधित असल्याचे आढळले नाही. या अफवांमध्ये, लोकांना कोरोनावरील लस देऊ नका आणि ही लस हा धोकादायक असल्याचे सांगितले जात आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींचे जनतेला आवाहनभारतीय वैज्ञानिकांनी कोरोनाची लस विकसित करून आपले कर्तव्य पार पाडले आहे आणि आता खोट्या बातम्या आणि अफवा पसरविणाऱ्या प्रत्येक नेटवर्कला योग्य माहितीच्या सहाय्याने पराभूत करून आपले कर्तव्य पार पाडण्याची गरज आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी म्हटले आहे. प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये भाग घेण्यासाठी जाणाऱ्या एनसीसी कॅडेट्स, एनएसएस स्वयंसेवक आणि कलाकारांना संबोधित करताना पंतप्रधान म्हणाले की, अशा प्रकारच्या संघटनांनी नेहमीच आव्हानात्मक काळाचा सामना करण्यासाठी आपली भूमिका बजावली आहे. 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्याHealthआरोग्य