शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
5
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
6
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
7
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
8
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
9
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
10
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
11
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
12
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
13
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
14
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
15
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
16
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
17
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
18
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

घरगुती व कृषी पंपांना नवीन वीजजोडणी

By admin | Updated: February 27, 2015 00:36 IST

चंद्रशेखर बावनकुळे : मुळा-प्रवरा वीज संस्थेबाबत लवकरच तोडगा

चंद्रशेखर बावनकुळे : मुळा-प्रवरा वीज संस्थेबाबत लवकरच तोडगा
शिर्डी : राज्यात महावितरणाच्या माध्यमातून २५ हजार कोटी रुपये खर्च करून पायाभूत सुविधा निर्माण करण्यात येणार असून त्याद्वारे एका महिन्यात घरगुती आणि कृषी पंपांना वीजजोडणी देण्यात येतील़, अशी माहिती ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली़ नगर जिल्ह्यातील मुळा-प्रवरा वीज संस्थेबाबत लवकरच तोडगा काढू, असे आश्वासनही त्यांनी दिले़
चंद्रशेखर बावनकुळे यांनी गुरुवारी जिल्ह्यातील विज समस्येबाबत लोकप्रतिनिधी आणि अधिकारी यांची शिर्डी येथे बैठक घेतली़ यावेळी विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे व स्थानिक आमदार उपस्थित होते. बावनकुळे म्हणाले की, राज्यातील प्रत्येक विधानसभा कार्यक्षेत्रात आमदारांच्या अध्यक्षतेखाली महावितरणाच्या अधिकार्‍यांची एक समिती स्थापन करून वीज वितरणासह विजेसंदर्भात अन्य समस्यांचे निराकरण करण्याचा अधिकार या समितीला देण्यात येणार आहे़ तसेच प्रत्येक फिडरवर आऊट सोर्सिंगद्वारे सहा मुलांची नेमणूक करून वीज बिले वितरण, वसुली आणि विजेसंबंधी तक्रारी तात्काळ सोडविणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले़
आपल्या राज्याच्या वीज निर्मितीप्रकल्पासाठी छत्तीसगड राज्यातून कोळसा आणण्यासाठी वाहतूक खर्च मोठा आहे़ त्यामुळे वीजदर वाढला जातो़ त्यावर पर्याय म्हणून छत्तीसगडमध्येच वीजनिर्मिती प्रकल्प सुरू करण्याबाबत तेथील राज्य सरकारशी चर्चा सुरू असल्याचे त्यांनी सांगितले़
पुढील दोन वर्षांत वीजेचा दर कमी करून राज्यातील ११ कोटी जनतेला सरकार दिलासा देणार आहे़ जपान आणि जर्मनीच्या धरतीवर राज्यात अतिजलद ४०० केव्हीए विद्युत वाहिनीसाठी सिंगल पोल उभारून शेतकर्‍यांचे होणारे नुकसान टाळण्यासाठी ऊर्जा विभाग लवकरच निर्णय घेणार आहे़
़़़़़़़़़़़़़
शेतकर्‍यांकडे दहा हजार कोटीची थकबाकी
राज्यातील शेतकर्‍यांकडे दहा हजार कोटींची थकबाकी असून कृषी संजीवनी योजनेचा लाभ शेतकर्‍यांनी घ्यावा़ वर्षभरात चार लाख ग्राहकांना नवीन वीज जोडणी देण्याचे उद्दीष्ट राज्य सरकारने समोर ठेवले असल्याचे ऊर्जामंत्री बावनकुळे यांनी सांगितले़