शहरं
Join us  
Trending Stories
1
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
2
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
3
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
4
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
5
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
6
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
7
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
8
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
9
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
10
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
11
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
12
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
13
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
14
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
15
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
16
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
17
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
18
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
19
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
20
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
Daily Top 2Weekly Top 5

लोकसभा निवडणुकीपूर्वी घेणार नवी मतदान यंत्रे

By admin | Updated: April 3, 2017 06:07 IST

बहुजन समाज पार्टीने मतदान यंत्रांमध्ये मोठ्या प्रमाणावर मोठ्या प्रमाणावर गडबड केली गेल्याचे आरोप केल्याच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने अधिक सुरक्षित अशी नवी मतदान यंत्रे घेण्याची तयारी सुरू केली

नवी दिल्ली : पंजाब आणि उत्तर प्रदेश विधानसभांच्या ताज्या निवडणुकांमध्ये सपाटून मार खाल्लेल्या अनुक्रमे आम आदमी पार्टी आणि बहुजन समाज पार्टीने मतदान यंत्रांमध्ये मोठ्या प्रमाणावर मोठ्या प्रमाणावर गडबड केली गेल्याचे आरोप केल्याच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने अधिक सुरक्षित अशी नवी मतदान यंत्रे घेण्याची तयारी सुरू केली आहे.सध्या वापरात असलेली मतदानयंत्रे सन २००६ पूर्वीची असून त्यांचे १५ वर्षांचे ‘आयुष्य’ संपत आल्याने अशी सर्व बदलण्यासाठी ९ लाख ३० हजार ४३० नवी यंत्रे खरेदी करण्याचे निवडणूक आयोगाने ठरविले आहे. या यंत्रांची खरेदी येत्या वर्षभरात पूर्ण होईल आणि २०१९ मधील लोकसभा निवडणुकीपूर्वी ती उपलब्ध होतील, असा अंदाज आहे.सूत्रांनुसार खरेदी केली जाणारी नवी यंत्रे ‘एम३’ या प्रकारची अत्याधुनिक यंत्रे असतील व यंत्रात कोणी गडबड करण्याचा प्रयत्न केल्यास ते आपोआप बंद पडण्याची त्यांत व्यवस्था असेल. या यंत्रांमध्ये त्यांचा असलीपणा ओळखण्याची अंगभूत यंत्रणा असेल. अणू ऊर्जा खात्याच्या अखत्यारितील इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन आॅफ इंडिया व संरक्षण मंत्रालयाच्या अखत्यारितील भारत इलेक्ट्रॉनिक्स लि. या सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांनी बनविलेल्या यंत्रांमध्येच अशी यंत्रणा असते व फक्त अशीच यंत्रे पर्स्परांशी जोडली जाऊ शकतात. त्यामुळे जी यंत्रे बनावट असतील ती आपोआपच ओळखली जाऊ शकतील.या नव्या यंत्रांच्या खरेदीसाठी लागणाऱ्या रकमेचा पहिला हप्ता म्हणून केंद्रीय मंत्रिमंडळाने गेल्या डिसेंबरमध्ये निवडणूक आयोगाला १,००९ कोटी रुपये मंजूर केले आहेत.एकूण अपेक्षित कर्च १,९४० कोटी रुपये आहे. या दोन कंपन्यांची उत्पादन क्षमता व पूर्वीचा अनुभव विचारात घेऊन प्रत्यक्षात घेण्याच्या यंत्रांच्या संख्येत कमी-अधिक बदल करण्याची मुभाही मंत्रिमंडळाने आयोगास दिली आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)>९२00 कोटी मंजूरयाआधी निवडणूक आयोगाने १४ लाख नवी मतदान यंत्रे खरेदी करण्याचा प्रस्ताव दिला होता. त्यासाठी लागणाऱ्या रकमेचा पहिला हप्ता म्हणून ९,२०० कोटी रुपये गेल्या जुलैमध्ये मंजूर केले गेले होते. गेल्या तीन वित्तीय वर्षांत आयोगाने नवी यंत्रे खरेदी केलेली नाहीत.