शहरं
Join us  
Trending Stories
1
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
2
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
3
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
4
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
5
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
6
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
7
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
8
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
9
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
10
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
11
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
12
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
13
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
14
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
15
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
16
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
17
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
18
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
19
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
20
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
Daily Top 2Weekly Top 5

नेताजींचा ड्रायव्हर सर्वात वृद्ध

By admin | Updated: April 18, 2016 02:36 IST

नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे आझाद हिंद सेनेच्या काळातील ड्रायव्हर कर्नल निजामुद्दीन हे वयाच्या ११६ व्या वर्षी जगातील सर्वात वयोवद्ध व्यक्तीचा मान मिळविण्याचे दावेदार ठरले आहेत.

आझमगढ : नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे आझाद हिंद सेनेच्या काळातील ड्रायव्हर कर्नल निजामुद्दीन हे वयाच्या ११६ व्या वर्षी जगातील सर्वात वयोवद्ध व्यक्तीचा मान मिळविण्याचे दावेदार ठरले आहेत.कर्नल निजामुद्दीन ऊर्फ सैफुद्दीन यांच्या वयाला रविवारी ११६ वर्षे तीन महिने १४ दिवस पूर्ण झाले. जगातील सर्वात वयोवद्ध म्हणून नोंद झालेल्या जपानी व्यक्तीचे यंदाच्या फेब्रुवारीत निधन झाले. त्यामुळे आता तो मान कर्नल निजामुद्दीन यांना मिळेल, असे बोलले जाते. कर्नल निजामुद्दीन आणि त्यांची पत्नी अजबुनिशा हिच्यासोबत येथील स्टेट बँकेत दोघांच्या नावे संयुक्त खाते उघडण्यासाठी जन्मतारखेचे जे दस्तावेज सादर केले त्यावरून त्यांचे वय ११६ वर्षे असल्याचे स्पष्ट झाले. त्यांनी सादर केलेल्या मतदार ओळखपत्रावर व पासपोर्टवर त्यांचा जन्म सन १९०० मध्ये झाल्याची नोंद आहे. विशेष म्हणजे कर्नल निजामुद्दीन यांची पत्नी १०७ वर्षांची आहे.आपल्या नेहमीच्या बघण्यातील निजामुद्दीन चाचा जगातील सर्वात वृद्ध व्यक्ती ठरावेत याने स्थानिक नागरिकांना साश्चर्य आनंद झाला. जिल्हा प्रशासन या दाम्पत्याचा यथोचित सत्कार करण्याच्या विचारात आहे. निझामुद्दीन यांचा जन्म उत्तर प्रदेशातील आझमगढ जिल्ह्यात मुबारकपूर भागातील धाकवा खेड्यात झाला. त्यांना स्वातंत्र्यसैनिकाचा दर्जा मिळाला तो २०१३ मध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीच्या दिवशी. मे २०१४ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निझामुद्दीन यांचे चरणस्पर्श करून त्यांचा सत्कार केला होता व त्यांचे आशीर्वाद मागितले होते.