शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
5
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
6
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
7
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
8
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
9
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
10
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
11
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
12
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
13
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
14
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
15
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
16
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
17
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
18
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
19
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
20
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

विमान अपघातातून नेताजी बचावले होते !

By admin | Updated: April 1, 2016 00:53 IST

नेताजी सुभाषचंद्र बोस हे १८ आॅगस्ट १९४५ मध्ये तायवान येथे घडलेल्या विमान अपघातातून सुखरूप बचावले होते, असे स्पष्ट संकेत मोदी सरकारने मंगळवारी सार्वजनिक केलेल्या

हैदराबाद : नेताजी सुभाषचंद्र बोस हे १८ आॅगस्ट १९४५ मध्ये तायवान येथे घडलेल्या विमान अपघातातून सुखरूप बचावले होते, असे स्पष्ट संकेत मोदी सरकारने मंगळवारी सार्वजनिक केलेल्या तीन गोपनीय फायलींपैकी एका फाईलवरून मिळाले आहेत. नेताजींनी या विमान अपघातानंतर तीनदा रेडिओवर भाषण दिल्याचा उल्लेख या फाईलमध्ये आहे. हे तिन्ही रेडिओ प्रसारण विमान अपघात घडल्यानंतरचे आहेत. त्यामुळे नेताजींच्या मृत्यूबाबतचे रहस्य अधिक गडद झाले आहे.फाईल क्रमांक ८७०/११/पी/१६/९२/पीओएलमध्ये या रेडिओवरील प्रसारणांचा तपशील दिलेला आहे, जे नेताजींनी दिल्याचे मानले जाते. बंगालच्या गव्हर्नर हाऊसमधून या प्रसारणांचा मजकूर बाहेर आल्याची शक्यता आहे. ३१-मीटर बँडवरून उचलल्याचा दावा गव्हर्नर हाऊसमधील पी. सी. कार यांनी केल्याचा उल्लेख यात आहे.१ जानेवारी १९४६ रोजीचे दुसरे प्रसारण‘आम्हाला दोन वर्षांच्या आत स्वातंत्र्य मिळणारच आहे. ब्रिटिश साम्राज्यवाद पार कोसळला आहे आणि त्यांना आता भारताला स्वातंत्र्य द्यावेच लागेल. अहिंसेच्या मार्गाने भारत कधीच स्वतंत्र होणार नाही. परंतु मी गांधींचा आदर करतो.’२६ डिसेंबर १९४५ रोजीचे पहिले भाषण ‘हल्ली मी महान जागतिक शक्तींच्या आश्रयाला आहे. माझे हृदय भारतासाठी तळमळत आहे. जेव्हा तिसरे महायुद्ध शिखरावर पोहोचले असेल तेव्हा मी भारतात जाईन. ही संधी दहा वर्षांनंतर किंवा त्याआधीही मिळू शकते. तेव्हा मी त्या लोकांना न्यायाच्या पिंजऱ्यात उभा करेल, जे लाल किल्ल्यावर माझ्या लोकांवर खटला चालवित आहेत.’(हे प्रसारित भाषण नेताजींचेच असल्याचे मानले जाते)फेब्रुवारी १९४६ मधील तिसरे प्रसारण‘जपानने आत्मसमर्पण केल्यानंतर माझ्या भारतीय बंधू-भगिनींना संबोधित करण्याची ही माझी तिसरी वेळ आहे. इंग्लंडचे पंतप्रधान पेथिक लॉरेन्स आणि अन्य दोन सदस्यांना भारतात पाठवित आहेत. त्यांचा उद्देश सर्व मार्गांनी भारताचे रक्त शोषून ब्रिटिश साम्राज्यवादाची कायमस्वरूपी वसाहत निर्माण करण्याशिवाय दुसरा नाही.’