शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
2
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; ६ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
3
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
4
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
5
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
6
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
7
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
8
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
9
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
10
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
11
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
12
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
13
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
14
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
15
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
16
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
17
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
18
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
19
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
20
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
Daily Top 2Weekly Top 5

नेस्लेच्या सेरेलॅकमध्ये आढळले जिवंत किडे !

By admin | Updated: June 17, 2015 04:01 IST

नेसले या बहुराष्ट्रीय कंपनीच्या मॅगीवरील बंदीची चर्चा विरण्यापूर्वीच याच कंपनीच्या सेरेलॅक या बेबीफूडच्या बंद पाकिटात किडे आढळून

कोईमतूर : नेसले या बहुराष्ट्रीय कंपनीच्या मॅगीवरील बंदीची चर्चा विरण्यापूर्वीच याच कंपनीच्या सेरेलॅक या बेबीफूडच्या बंद पाकिटात किडे आढळून आल्याने कंपनीच्या अडचणीत भर पडण्याची चिन्हे आहेत. कोईमतूर शहरातील एका आयटी व्यावसायिकाने आपल्या एक वर्षाच्या मुलासाठी सेरेलॅकचे पाकीट खरेदी केले असता, त्या पाकिटात जिवंत किडे आढळले. एस. श्रीराम असे या आयटी व्यावसायिकाचे नाव असून, त्यांनी पेरूर येथील औषधाच्या दुकानातून नेस्लेच्या सेरेलॅकचे पाकीट रविवारी खरेदी केले होते. त्यांच्या पत्नीने सोमवारी दुपारी हे पाकीट उघडले असता, त्यात लाल रंगाचे किडे आढळून आले. गहू व दूध यांचे मिश्रण असलेले हे लहान मुलांचे खाद्य फेब्रुवारी २०१६ पर्यंत चांगले (सेवन करण्यायोग्य) असेल, असे या पाकिटावर लिहिले होते. एस. श्रीराम यांनी मंगळवारी अन्न सुरक्षा खात्याकडे तक्रार केली असून, सेरेलॅकचे ते पाकीट सरकारी प्रयोगशाळेत चाचणीसाठी देण्यात आले आहे. नेस्लेला मॅगीबंदीमुळे आतापर्यंत ३०० हून अधिक कोटींचे नुकसान झाले असून, त्यात आता या घटनेने आणखी भर पडण्याची शक्यता आहे. (वृत्तसंस्था)