बळजबरीचे धर्मांतर रोखण्यासाठी कठोर कायद्याची गरज- शहा
By admin | Updated: December 12, 2014 23:49 IST
नवी दिल्ली-आगऱ्यात हिंदुत्ववादी संघटनांनी बळजबरीने केलेल्या धर्मांतरणाच्या वादादरम्यान भाजपाचे प्रमुख अमित शहा यांनी बळजबरीने केले जाणारे धर्मांतर रोखण्यासाठी कठोर कायद्याची शिफारस केली.
बळजबरीचे धर्मांतर रोखण्यासाठी कठोर कायद्याची गरज- शहा
नवी दिल्ली-आगऱ्यात हिंदुत्ववादी संघटनांनी बळजबरीने केलेल्या धर्मांतरणाच्या वादादरम्यान भाजपाचे प्रमुख अमित शहा यांनी बळजबरीने केले जाणारे धर्मांतर रोखण्यासाठी कठोर कायद्याची शिफारस केली.बळजबरीने धर्मांतर केले जाऊ नये व त्याविरुद्ध कठोर कायदा लागू व्हावा असे म्हणून त्यांनी, त्या कायद्याचे समर्थन सर्व पक्षांनी करावे असे आवाहन केले. मात्र भाजपावगळता अन्य कुठलाही पक्ष आपली गठ्ठामते गमवण्याच्या भीतीपोटी याचे समर्थन करणार नाहीत असा शेराही व्यक्त केला. पक्षाचे खासदार साक्षी महाराज यांच्या नथुराम गोडसे व साध्वी निरांजन ज्योती यांच्या द्वेषपूर्ण वक्तव्यांवर प्रतिक्रिया देताना त्यांनी भाजपा नेत्यांनी संयम दाखवावा व अशा मुद्यांवर वक्तव्ये देणे टाळावे असे म्हटले आहे. लव्ह जिहादच्या मुद्यावर बोलताना त्यांनी, त्या शब्दाचा त्यांचा पक्ष वा पक्ष नेत्यांनी उच्चार केला नसल्याचे प्रतिपादन करून ही प्रसिद्धीमाध्यमांची करणी असल्याचे म्हटले. हा पूर्णपणे स्त्रियांच्या शोषणाशी जुळलेला मुद्दा असून आम्ही त्याच्या विरोधात आहोत. भाजपाच्या कोणत्याही नेत्याने या शब्दाचा वापर आजतागायत केला नाही असे त्यांनी स्पष्ट केले. राम मंदिराच्या मुद्याबाबत त्यांनी भाजपाचा विचार स्पष्ट असल्याचे म्हटले. पक्षाच्या संकल्पाचा पुनरुच्चार करीत त्यांनी २०१९ पर्यंत देशाला काँग्रेसमुक्त करण्याचे धोरण व्यक्त केले. काळ्या पैशाच्या मुद्यावर त्यांनी भाजपा सरकारने भरीव पावले उचलली असून परदेशातील काळा पैसा परत आणण्याच्या दृष्टीने काम सुरू असल्याचे सांगितले.