राष्ट्रवादीकडून निषेध
By admin | Updated: June 2, 2014 08:55 IST
पंचवटी : सोशल नेटवर्कवर महापुरूषांची बदनामी करणार्या पोस्ट टाकणार्या समाज कंटकांचा पंचवटी राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या वतीने तीव्र निषेध करण्यात आला. सकाळी पंचवटी कारंजा येथे पंचवटी विभाग अध्यक्ष देवांग जानी यांच्या नेतृत्वाखाली छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला.
राष्ट्रवादीकडून निषेध
पंचवटी : सोशल नेटवर्कवर महापुरूषांची बदनामी करणार्या पोस्ट टाकणार्या समाज कंटकांचा पंचवटी राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या वतीने तीव्र निषेध करण्यात आला. सकाळी पंचवटी कारंजा येथे पंचवटी विभाग अध्यक्ष देवांग जानी यांच्या नेतृत्वाखाली छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर डोक्याला काळया पया बांधून शांततेच्या मार्गाने समाजकंटकांचा जाहीर निषेध करण्यात आला. महापुरूषांची बदनामी करून जातीय दंगल पेटविण्याचा प्रयत्न करणार्या समाजकंटकांना त्वरीत ताब्यात घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. अवघ्या महाराष्ट्राच्या कुलदैवतावर कोणी टिका टिप्पणी करीत असेल तर कायद्या हातात घ्यावा लागला तरी चालेल असे मत यावेळी उपस्थितांनी व्यक्त केले. यावेळी सुभाष चव्हाण, भूषण काळे, मंजूषा जाखडी, संतोष जगताप, किरण पानकर, अभिजीत गाडे, राम जाधव, प्रमोद मंडलिक, देवांग जोशी, पवन कांदू, आदिंसह राष्ट्रवादी कॉँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते. (वार्ताहर)