शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
5
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
6
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
7
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
8
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
9
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
10
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
11
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
12
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
13
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
14
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
15
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
16
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
17
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
18
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

नक्षली हल्ल्याचा कट उधळला

By admin | Updated: October 17, 2016 05:28 IST

उत्तर प्रदेश पोलिसांनी राष्ट्रीय राजधानी आणि आसपासच्या भागात मोठा हल्ल्ला करण्याचा कट उधळून लावणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला.

नोएडा (उत्तर प्रदेश): दहा नक्षलवाद्यांना जेरबंद करून उत्तर प्रदेश पोलिसांनी राष्ट्रीय राजधानी आणि आसपासच्या भागात मोठा हल्ल्ला करण्याचा कट उधळून लावणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला. अटक करण्यात आलेल्यांत एका स्वयंघोषित एरिया कमांडरचा समावेश असून, पोलिसांनी मोठ्या प्रमाणावर शस्त्र आणि स्फोटकांचा साठा जप्त करण्यात आला आहे.डावे जहालवादी बॉम्ब तयार करीत होते आणि त्यांना दिल्लीत घातपात घडवून आणण्याचा त्यांचा इरादा होता, अशी माहिती उत्तर प्रदेश विशेष कृती दलाचे महानिरीक्षक असीम अरुण यांनी घाईघाईने बोलाविलेल्या पत्रकार परिषदेत दिली. रात्रभर धाडसत्र मोहीम राबवून दिल्लीलगतच्या नोएडा येथून नऊ नक्षलवाद्यांना पकडण्यात आले. नऊपैकी सहा जणांना शनिवारी रात्री जेरबंद करण्यात आले, तर अन्य तिघांना रविवारी सकाळी उचलण्यात आले. एकाला बिहारलगतच्या चंदौली येथे अटक करण्यात आली. झारंखडमधील लतेहार जिल्ह्यातील बरियातून गावचा स्वयंघोषित कमांडर प्रदीप सिंह खरवार हा फेब्रुवारी २०१२ पासून नोएडात दडी मारून बसला होता. त्याला पकडण्यासाठी ५ लाख रुपयांचा इनामही घोषित करण्यात आला होता. (वृत्तसंस्था)>५५० काडतुसांसह शस्त्र-स्फोटके जप्तविशेष कृती दलाच्या अधिकाऱ्याने सांगितले की, या कटकारस्थानाची खबर लागताच सेक्टर ४९ हिंदोनविहारस्थित एका सदनिकेवर धाड टाकण्यात आली. या ठिकाणांहून ५५० जिवंत काडतुसे, आयएनएसएएस अ‍ॅसॉल्ट रायफल, अन्य दोन रायफली आणि तीन मॅगझिन्ससह मोठ्या प्रमाणावर स्फोटके आणि डिटोनेटर्स जप्त करण्यात आली. आयएनएसएएस रायफल एका सुरक्षा कर्मचाऱ्यांकडून लुटण्यात आली असावी, असा संशय आहे. अटक करण्यात आलेले नक्षलवादी पूर्व उत्तर प्रदेश आणि लगतच्या बिहारच्या भागात सक्रिय होते. त्यांनी नोएडात तळ बनविला होता. प्रॉपर्टी डीलर्स म्हणून त्यांनी या भागात दोन फ्लॅट भाड्याने घेतले होते. ही मोहीम चालू ठेवली जाणार असून, आणखी काही जण हाती लागण्याची शक्यता आहे, असे असीम अरुण यांनी सांगितले. इनाम घोषित करण्यात आलेला पीपल्स वॉर ग्रुपचा माजी स्वयंघोषित एरिया कमांडर रणजित पासवान बिहारच्या नक्षलग्रस्त सासाराम जिल्ह्यातील सक्रिय होता. त्याला चंदौली येथून जेरबंद करण्यात आले.