शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
5
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
6
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
7
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
8
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
9
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
10
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
11
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
12
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
13
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
14
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
15
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
16
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
17
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
18
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

नौदलाची मोठ्या युद्धसरावाची तयारी

By admin | Updated: October 30, 2016 02:09 IST

सीमेवर पाकिस्तानी लष्करासोबत धुमश्चक्री सुरू असल्याच्या पार्श्वभूमीवर भारतीय सैन्यदले शत्रूच्या कोणत्याही आगळिकीला चोख प्रत्युत्तर देण्यास सज्ज आहेत.

नवी दिल्ली : सीमेवर पाकिस्तानी लष्करासोबत धुमश्चक्री सुरू असल्याच्या पार्श्वभूमीवर भारतीय सैन्यदले शत्रूच्या कोणत्याही आगळिकीला चोख प्रत्युत्तर देण्यास सज्ज आहेत. लष्कर आणि हवाई दलाने आधीच तयारी केली असून, आता नौदलही युद्धसराव करून कंबर कसणार आहे. या युद्धसरावाला ‘पश्चिम लहर’ असे नाव देण्यात आले असून, पुढील आठवड्यात अरबी समुद्रात तो सुरू होईल. ‘पश्चिम लहर’ यापूर्वी करण्यात आलेल्या डिफेन्स आॅफ गुजरात एक्सरसाईजचेच (डीजीएक्स) विशाल रूप असून, युद्धाच्या सज्जतेचा आढावा घेणे आणि जलमार्गे दहशतवादी हल्ल्याच्या मुकाबल्याची तयारी करणे हा त्याचा उद्देश असल्याचे नौदल सूत्रांनी सांगितले. मुंबईतील पश्चिम नौदल कमांडद्वावारे २ नोव्हेंबर ते १४ नोव्हेंबरदरम्यान हा सराव करण्यात येईल. पश्चिम किनारपट्टीवरील या सरावासाठी पाणबुडी आणि युद्धनौकांशिवाय लढाऊ विमान, टेहेळणी विमान आणि मानवरहित विमान यापूर्वीच सरावस्थळी दाखल झाले आहेत. सरावात पूर्वेकडील जहाजांनाही सामील करण्यात आले आहे, असे लष्करातील वरिष्ठ सूत्रांनी सांगितले. संरक्षण मंत्रालयाने तिन्ही सैन्यदलांचे उपप्रमुख लेफ्टनंट जनरल विपीन रावत, एअर मार्शल बी.एस. धनाओ आणि व्हाईस अ‍ॅडमिरल के.बी. सिंग यांना आपत्कालीन आर्थिक अधिकारही दिले आहेत. याशिवाय खरेदी समित्याही स्थापन करण्यात आल्या असून, त्या सुरक्षा दलांकडील दारूगोळ्याच्या साठ्यातील त्रुटी लवकरच दूर करतील, असे या सूत्रांनी स्पष्ट केले. गुरुवारी कुपवाडाच्या माचील भागात भारतीय जवानाचा मृतदेह छिन्नविच्छिन्न करण्यात आला होता. यात बॅटचा हात असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. (वृत्तसंस्था)पाकिस्तानी लष्करप्रमुख जनरल राहील शरीफ त्यांच्या सेवानिवृत्तीपूर्वी दहशतवादी आणि बॉर्डर अ‍ॅक्शन टीमच्या (बॅट) माध्यमातून भारतात मोठा हल्ला करू शकतात, असा संशय भारतीय सुरक्षा यंत्रणेला आहे.