शहरं
Join us  
Trending Stories
1
निलंबत अधिकारी रणजीत कासले पुण्यात दाखल; निवडणुकीत गप्प राहण्यासाठी कराडने पैसे दिल्याचा आरोप
2
तात्पुरता दिलासा की क्लीन चिट? ससूनच्या चार पानी अहवालात दीनानाथ रुग्णालय, डॉ. घैसास यांच्यावर ठपका नाही
3
“हिंदी सक्तीने लादणे हा मराठीवर अन्याय, मराठी भाषिकांच्या अस्मितेवर घाला”: विजय वडेट्टीवार
4
पांड्याचं सेलिब्रेशन झालं! हेडनं मान खाली घालून पॅव्हेलियनचा रस्ता धरलेला अन् 'सायरन' वाजला
5
भाजपाचे ज्येष्ठ नेते दिलीप घोष वयाच्या ६१ व्या वर्षी बांधणार लग्नगाठ, पक्षाच्या महिला कार्यकर्तीसोबत अडकणार विवाह बंधनात
6
अजितदादा-शरद पवार एकत्र येण्यासाठी पांडुरंगाच्या चरणी साकडे घातले का? सुनील तटकरे म्हणाले...
7
…तर ते कागद दाखवावे लागतील?, नव्या ‘वक्फ’ कायद्यावरील सुनावणीत ती मेख, केंद्र होणार खूश   
8
देवेंद्र फडणवीसांच्या विधानसभा २०२४ च्या विजयाला आव्हान; हायकोर्टाने समन्स बजावले
9
आयटेलचा 'एआय'वाला ए९५ स्मार्टफोन लाँच; १०,००० च्या आत किंमत...
10
IPL 2025 MI vs SRH : काय करायचं त्या बॉलरनं? दीपक चाहरनं जोर लावला! पण...
11
VIDEO: परप्रांतीय विक्रेत्याने गटारात धुतले ताडगोळे; खेडमधील किळसवाणा प्रकार
12
बॉम्ब हल्ला प्रकरणात लष्कराच्या जवानाला अटक; गँगस्टरला इंस्टाग्रामवरुन दिले ग्रेनेड फेकण्याचे प्रशिक्षण
13
आम्ही पळून जाणाऱ्यातले नाही, लढत राहू;अजित पवारांच्या स्वागतफलकाबाबत रोहित पवारांनी केला खुलासा
14
...तर अमेरिकनांचा इन्कम टॅक्स कायमचा बंद होईल; टेरिफ वॉरवरून ट्रम्पनी स्वत:चीच पाठ थोपटून घेतली
15
वक्फ कायद्यात एक जरी चूक निघाली तरी खासदारकीचा राजीनामा देणार; जेपीसी अध्यक्षांची मोठी घोषणा
16
भारतीय वंशाच्या शास्त्रज्ञाने शोधला एलियन्सचं वास्तव्य असलेला ग्रह, संशोधनानंतर केला दावा
17
“जनतेला फसवणाऱ्या महायुती सरकारविरोधात लढाई तीव्र करणार”; मुंबई बैठकीत काँग्रेसचा निर्धार
18
महेश मांजरेकरांना व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्कार जाहीर; मुक्ता बर्वे, काजोलचाही होणार सन्मान
19
Waqf Law: नव्या वक्फ कायद्यातील दोन तरतुदींना सुप्रीम कोर्टाची स्थगिती; सरकारकडून मागितलं उत्तर
20
"....म्हणून मी तिला देणार नाही घटस्फोट’’,  होणाऱ्या जावयासोबत पळालेल्या महिलेच्या पतीनं सांगितलं कारण

‘नॅचरल हिस्ट्री म्युझियम’ भस्मसात

By admin | Updated: April 27, 2016 04:30 IST

राष्ट्रीय नैसर्गिक इतिहास संग्रहालयाला (नॅचरल हिस्ट्री म्युझियम) सोमवारी लागलेल्या भीषण आगीत हे संग्रहालय जळून भस्मसात झाले.

नवी दिल्ली : मध्य दिल्लीत फिक्कीच्या इमारतीतील राष्ट्रीय नैसर्गिक इतिहास संग्रहालयाला (नॅचरल हिस्ट्री म्युझियम) सोमवारी लागलेल्या भीषण आगीत हे संग्रहालय जळून भस्मसात झाले. याठिकाणी जतन करण्यात आलेल्या बहुतांश अमूल्य कलाकृती आणि वस्तू आगीत जळून खाक झाल्या आहेत.रात्री १.४५ वाजता लागलेली ही आग तब्बल चार तासांच्या अथक परिश्रमांनंतर आटोक्यात आणण्यात आली. या दरम्यान अत्याधिक धुरामुळे अग्निशामक दलाच्या सहा जवानांची प्रकृती बिघडल्यानंतर त्यांना इस्पितळात दाखल करण्यात आले. त्यांची प्रकृती आता स्थिर असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी घटनास्थळाचा दौरा केला. ही अत्यंत दुर्दैवी घटना असल्याचे सांगून त्यांनी मंत्रालयाअंतर्गत येणाऱ्या सर्व संग्रहालयांच्या सुरक्षेचा आढावा घेण्याचे आदेश दिले. मंत्रालयाच्या अखत्यारित एकूण ३४ संग्रहालये आहेत. नॅचरल हिस्ट्री म्युझियम ही आपली राष्ट्रीय संपत्ती आहे. तेथे हजारो वस्तू प्रदर्शित करण्यात आल्या असून असंख्य लोक दररोज भेट देतात. त्यामुळे आगीत झालेली हानी भरून निघणारी नाही,अशी खंत जावडेकर यांनी व्यक्त केली. मंडी हाऊसस्थित फिक्की इमारतीतील संग्रहालयाच्या सर्वात वरच्या मजल्यावर ही आग लागली होती. त्याठिकाणी दुरुस्तीचे काम सुरू होते. बघताबघता आगीने रौद्ररूप धारण करीत इतर मजल्यांनाही आपल्या विळख्यात घेतले. (लोकमत न्यूज नेटवर्क)>१९७२ साली झाली होती स्थापनानवी दिल्लीत १९७२ साली नॅचरल हिस्ट्री म्युझियमची स्थापना करण्यात आली होती. नैसर्गिक इतिहासाशी संबंधित देशातील दोन संग्रहालयांपैकी ते एक आहे. अग्निशामक विभागाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, आग विझविण्यासाठी किमान ३५ गाड्या वापरण्यात आल्या. आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. आग लागली तेव्हा इमारतीत जास्त लोक नव्हते आणि अग्निशामक दल तेथे पोहोचताच इमारत रिकामी करण्यात आली.