राष्ट्रीय महत्त्वाचे- आतील पान
By admin | Updated: December 16, 2014 23:44 IST
तेलंगण मंत्रिमंडळाचा विस्तार
राष्ट्रीय महत्त्वाचे- आतील पान
तेलंगण मंत्रिमंडळाचा विस्तारहैदराबाद- तेलंगणचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी आपल्या मंत्रिमंडळाचा विस्तार करीत सहा सदस्यांना त्यात सहभागी करून घेतले. यातील दोन सदस्य अलीकडेच तेलगु देसम पार्टी सोडून टीआरएसमध्ये दाखल झाले होते. या मंत्रिमंडळाचा हा पहिलाच विस्तार आहे.------------------------------- इटालियन नाविकांची निवेदने फेटाळलीनवी दिल्ली-मॅसिमिलियानो लातोर व सल्वातोर गिरोन या दोन इटालियन नाविकांनी नाताळ सणासाठी मायदेशी परत जाण्याकरिता केलेल्या निवेदनांना सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावले. त्यांनी आरोग्याच्या कारणाखातर प्रवासाचा कालावधी वाढवून मागण्यासाठी व नाताळसाठी ही निवेदने दिली होती.------------------------------मुजफ्फरनगर दंगलप्रकरणी चौघांना अटकमुजफ्फरनगर- येथील कुतबा गावात गेल्या वर्षी झालेल्या दंगलीतील चार आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यांना न्यायालयीन कोठडीत रवाना करण्यात आले आहे. या दंगलीत ५० जण सामील असून आतापर्यंत १४ जणांना अटक झाली आहे. -----------------------------देशात मृत्युदंडाचे ३८२ कैदीनवी दिल्ली- देशातील विविध कारागृहांमध्ये मृत्युदंडाची शिक्षा झालेले एकूण ३८२ कैदी असल्याची माहिती गृहराज्यमंत्री हरिभाई चौधरी यांनी लोकसभेला दिली. गेल्या ३४ वर्षांत १२३ दया याचिका राष्ट्रपतींसमोर विचाराकरिता सादर झाल्याचेही ते पुढे म्हणाले. -----------------------रेल्वे-जीपची धडक : पाच ठारनवादा- बिहारच्या नवादा जिल्ह्यातील किऊल-गया रेल्वे मंडळातील शफीगंज गावाजवळ एका अवैध रेल्वे क्रॉसिंगवरून जाणाऱ्या जीपवर रेल्वे गाडी आदळल्याने झालेल्या अपघातात पाच जण ठार झाले तर अनेक जण जखमी झाल्याची घटना घडली. जखमींना रुग्णालयात दाखल केले असून या घटनेचा तपास पोलीस करीत आहेत.------------------------------पंतप्रधानांनी केले जवानांच्या बलिदानाचे स्मरणनवी दिल्ली- विजय दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सशस्त्र दलातील जवानांच्या बलिदानाचे स्मरण केले. सोशल नेटवर्किंग साईट टिष्ट्वटरवर त्यांनी, या जवानांविषयी आपल्याला अभिमान वाटत असल्याचे नोंदविले आहे. -------------------------------मालदात नऊ अर्भकांचा मृत्यूमालदा- प. बंगालच्या मालदा वैद्यकीय महाविद्यालयात गेल्या दोन दिवसात नऊ अर्भकांचा मृत्यू झाला आहे. येथील मुख्य आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप कुमार मंडल यांनी त्यांच्या मृत्यूचे कारण कुपोषणासह श्वास घेण्यात अडथळा आदी असल्याचे सांगितले. -------------------------------उत्तर प्रदेश गारठलालखनौ-उत्तर प्रदेशाला पावसापासून दिलासा मिळाला असला तरी येथे थंडीचा कडाका झपाट्याने वाढला आहे. तापमानात घट झाल्याने थंडगार हवा वाहत असल्याने नागरिकांना या गार हवेचा सामना करावा लागतो आहे. गेल्या २४ तासात थंडी व धुक्यामुळे पाच जण ठार झाल्याचे सांगण्यात आले.------------------------------