नवी दिल्ली : देशाकडून खेळावे की आयपीएलमध्ये अशा द्विधा मन:स्थितीत असलेला वेस्ट इंडीजचा स्टार गोलंदाज सुनील नरीन याने अखेर न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत न खेळता भारतात सुरू असलेल्या इंडियन प्रीमिअर लीगमध्ये खेळण्याचा निर्णय घेतला आह़े आयपीएलमध्ये कोलकाता संघ फायनलमध्ये पोहोचला आह़े फायनलमध्ये या संघाचा सामना किंग्ज इलेव्हन पंजाबशी होणार आह़े मात्र, या खेळाडूपुढे आपल्या देशाकडून खेळावे की आयपीएलमध्ये, हा पेच निर्माण झाला होता़ अखेर त्याने देशाकडून नव्हे, तर आयपीएलमध्ये केकेआरकडून खेळण्यास पसंती दिली आह़े वेस्ट इंडीज क्रिकेट मंडळाचे (डब्ल्यूआयसीबी) संचालक रिचर्ड पायबस यांनी सांगितले, की न्यूझीलंडविरुद्ध होणा:या 3 कसोटी सामन्यांच्या मालिकेत सुनील नरेन वेस्ट इंडीज संघाकडून खेळणार नाही़ कारण त्याने आयपीएलमध्ये खेळण्याचा निर्णय घेतला आह़े विंडीज मंडळाच्या निर्णयानुसार 26 वर्षीय नरीन याने रविवारी सुरू होणा:या संघाच्या सराव शिबिरात सहभाग घेणो अनिवार्य होत़े मात्र, याच दिवशी कोलकाता आणि पंजाब यांच्यात फायनल होणार आह़े त्यामुळे त्याचा कसोटी मालिकेत समावेश करण्यात आला नाही़
नरीनचे विंडीजला ‘नो’ केकेआरला ‘यस’
By admin | Updated: June 1, 2014 00:42 IST