शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

मोदी भक्तासाठी साक्षात मोदींचं ट्विट

By admin | Updated: March 15, 2017 16:10 IST

मोदी स्वतःच्या चाहत्यांच्या ट्विटलाही ब-याचदा न विसरता चोख प्रत्युत्तर देत असतात.

ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 15 - देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देहभान हरपून जनतेसाठी काम करतायत. त्यांचा दृष्टिकोन एकदम स्पष्ट आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अनेकांची हृदय जिंकली आहेत. प्रत्येक भारतीय नरेंद्र मोदींची न्यू इंडिया संकल्पना कधी प्रत्यक्षात उतरले आहे, याची आतुरतेनं वाटत पाहत आहे. तसेच भाजपानं देशाच्या राजकारणात महत्त्वाचं स्थान असलेल्या उत्तर प्रदेशमधीलही सत्ता काबीज केली आहे.

उत्तर प्रदेशमधल्या विजयानंतर दिलेल्या एका भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हे सरकार प्रत्येकासाठी काम करेल, असं आश्वासन दिलं होतं. तसेच 2022पर्यंत न्यू इंडिया प्रत्यक्षात साकारणार असल्याचंही नरेंद्र मोदींनी जनतेला वचन दिलं आहे. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले होते की, न्यू इंडियात गरिबांना संधी मिळणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हल्लीच्या दिवसांत ट्विटरवर ब-यापैकी कार्यरत असतात. मोदी स्वतःच्या चाहत्यांच्या ट्विटलाही ब-याचदा न विसरता रिट्विट करून चोख प्रत्युत्तर देत असतात. अशातच मोदींचा एक चाहता अजित सिंह यानं मोदींच्या कामावर खूश होऊन त्यांच्यावर स्तुतिसुमनं उधळली आहेत.

मोदींच्या या चाहत्याला एकानं ट्विट करून तू मोदींसाठी काम करतोस काय, असं विचारलं, त्यावर त्या चाहत्यानंही समोरच्याला समर्पक उत्तर दिलं. मी मोदींसाठी नव्हे तर मोदी माझ्यासाठी काम करत असल्याचं तो ट्विटमधून म्हणाला आहे. हा सर्व प्रकार पाहून मोदींनीही त्याला प्रत्युत्तर दिलं.

मोदी रिट्विट करत म्हणाले, नक्कीच, प्रत्येक भारतीयासाठी मी प्रधान सेवकांचं काम करत असल्याचा मला आनंद आहे. त्यानंतर ट्विटरवरून मोदींनी अनेकांची मनं जिंकली. पंतप्रधान असतानाही मोदींनी प्रधान सेवक म्हणून स्वतःला म्हटल्यानं अनेकांनी त्यांची प्रशंसा केली आहे.