शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

नजनपाटील यांची पावणे दोन वर्षात तीन वेळा बदली गौडबंगाल : आता किरकोळ रजेवर की सक्तीच्या; चर्चेला उधाण

By admin | Updated: July 16, 2016 00:38 IST

जळगाव : चोपड्याच्या प्रकरणामुळे चर्चेत आलेले चोपडा शहरचे पोलीस निरीक्षक किसनराव नजनपाटील यांची पावणे दोन वर्षाच्या काळात तीन वेळा बदली झाली आहे. एका पोलीस स्टेशनला नेमणूक झाल्यानंतर नियमानुसार दोन वर्षाचा कालावधी पूर्ण झाल्यावर बदली होणे अपेक्षित असते. नजनपाटील मात्र, या नियमावलीला अपवाद ठरले आहेत. दोन वर्षाचा कार्यकाळ पूर्ण होण्याआधीच त्यांची वेगवेगळ्या कारणाने तीन वेळा उचलबांगडी झाली आहे.

जळगाव : चोपड्याच्या प्रकरणामुळे चर्चेत आलेले चोपडा शहरचे पोलीस निरीक्षक किसनराव नजनपाटील यांची पावणे दोन वर्षाच्या काळात तीन वेळा बदली झाली आहे. एका पोलीस स्टेशनला नेमणूक झाल्यानंतर नियमानुसार दोन वर्षाचा कालावधी पूर्ण झाल्यावर बदली होणे अपेक्षित असते. नजनपाटील मात्र, या नियमावलीला अपवाद ठरले आहेत. दोन वर्षाचा कार्यकाळ पूर्ण होण्याआधीच त्यांची वेगवेगळ्या कारणाने तीन वेळा उचलबांगडी झाली आहे.
जळगाव शहर पोलीस स्टेशनला १९ ऑगस्ट २०१४ रोजी नजनपाटील यांची नियुक्ती झाली होती. त्यानंतर अवघ्या दहा महिन्यात त्यांची उचलबांगडी झाली. १५ जून २०१५ रोजी त्यांना भुसावळ बाजारपेठला पाठविण्यात आले. शहर पोलीस स्टेशनला शिवसेनेचे गजानन मालपुरे यांच्याशी त्यांचा वाद झाला होता. त्यानंतर हा वाद न्यायालयात पोहचला होता. म्हणून १६ जून २०१५ रोजी नजनपाटील यांना भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशनला पाठविण्यात आले होते. भुसावळची कायदा व सुव्यवस्था ढासळल्याचे कारण सांगत तेथील परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलीस अधीक्षक सुपेकर यांनी आपल्याला भुसावळला पाठविले होते, असा दावा नजनपाटील यांनी तेव्हा केला होता. नंतर भुसावळहूनही त्यांची दहाच महिन्यात नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली होती. आमदार संजय सावकारे यांचे समर्थक पिंटू कोठारी यांच्यावर झालेल्या कारवाईतून सावकारे व नजनपाटील यांच्यात दरी निर्माण झाली होती. त्यातूनच त्यांची भुसावळहून उचलबांगडी झाल्याचे बोलले जात होते. तर तत्कालीन पालकमंत्री खडसेंच्या मर्जीतील पोलीस निरीक्षक चंद्रकांत सरोदे यांच्यासाठी नजनपाटील यांना हटविण्यात आल्याची तेव्हा चर्चा होती.
भाजपा कार्यकर्त्यांमुळे आले अडचणीत
काही दिवस नियंत्रण कक्षात काम केल्यानंतर ३० मे २०१६ रोजी नजनपाटील यांची चोपडा शहर पोलीस स्टेशनला नेमणूक करण्यात आली. तेथे १३ जून रोजी गायींचा ट्रक पकडल्यानंतर भाजप कार्यकर्त्यांनी ट्रक जाळला होता. त्या वादातून भाजपा कार्यकर्त्यांशी नजनपाटील यांचे बिनसले. म्हणून भाजपा कार्यकर्त्यांनी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे त्यांच्या तक्रारी केल्या. त्यानंतर ते रजेवर गेले आहेत.