शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
2
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
3
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
4
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
5
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
6
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
7
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
8
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
9
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
10
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
11
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
12
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
13
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
14
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
15
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
16
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
17
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
18
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
19
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
20
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
Daily Top 2Weekly Top 5

नांदगावी मराठा वज्रमूठ

By admin | Updated: December 30, 2016 23:05 IST

स्वयंशिस्तीचे दर्शन : आरक्षणासह इतर मागण्यांचा समावेश

नांदगाव : नागपूर येथील यशस्वी मोर्चानंतर जिल्ह्यातील पहिलाच मोर्चा ठरलेल्या नांदगाव तालुकास्तरीय मराठा क्रांती मोर्चाने तालुकावासीयांचे लक्ष वेधून घेतले. आज सकाळपासूनच महाविद्यालयाच्या दिशेने मोर्चेकरी गर्दीने जाताना दिसत होते. महाविद्यालयाच्या आवारात जमलेल्या गर्दीला आयोजक सूचना देत होते़  या मोर्चात सहभागी होण्यासाठी कुणी छत्रपती शिवाजी महाराज बनले तर कुणी जिजामाता अशा लक्षवेधी वेशभूषेत पेहराव करून तर कुणी अश्वावर स्वार होत आपला सहभाग नोंदवीत होते. या मोर्चाला दुपारी  १ वाजता महाविद्यालयापासून प्रारंभ झाला. मोर्चा लक्षात घेता पोलिसांनी नांदगावमध्ये येणाऱ्या सर्वच राज्यमार्गाकडची वाहतूक परस्पर बाहेरून वळविल्याने मोर्चा सुरळीत पार पडला. मालेगाव रस्त्याने निघालेल्या या मोर्चात महिला, युवती, विद्यार्थी यांच्यासह तालुक्याच्या कानाकोपऱ्यातून हजारोंच्या संख्येने मराठा समाजातील मंडळी सहभागी झाली होती. काळे वस्त्र परिधान केलेल्या या मोर्चात भगवे घेत ध्वज, अश्वावर स्वार झालेल्या युवती, कोणत्याही प्रकारची घोषणा न देता स्वयंंशिस्तीत निघालेला हा मोर्चा शनिमंदिर, महावीर मार्ग, शिवस्फूर्ती बाजार रस्ता, गांधी चौक, आंबेडकर चौकमार्गे जुन्या तहसील कार्यालयाजवळ धडकला. मोर्चा शिवस्फूर्ती मैदानात पोहोचला तेव्हा त्याचे दुसरे शेवटचे टोक शनि मंदिर व जैन धर्मशाळेजवळ होते. जवळपास वीस हजारांहून अधिक जण मोर्चात सहभागी असल्याचा अंदाज व्यक्त केला जात होता. जुन्या तहसीलजवळ असलेल्या हुतात्मा स्मारकाजवळ व्यासपीठ उभारण्यात आले होते. याठिकाणी व्यासपीठावर एकूण बारा युवती व लहान मुली स्थानापन्न झाल्या होत्या. स्नेह जाधव, श्रद्धा आहेर, दिव्या महाले, दर्शना भोसले, यशस्वी जाधव, हर्षदा रिंढे, आश्विनी जगदाळे यांनी सध्या मराठा समाजातील स्थितीवर भाष्य करीत आता मराठा पेटला असून, राज्यकर्त्यांनी त्याबाबत ठोस भूमिका घ्यावी अन्यथा आतापर्यंत मूक मोर्चा काढणारा समाज बोलू लागेल व रस्त्यावर उतरला तर त्याचे परिणाम भोगावे लागतील, अशा शब्दात आपल्या संतप्त भावनांना वाट मोकळी करून दिली. सभेचे संचालन अनिल काकडे यांनी केले. वक्त्यांची भाषणे संपताच राष्ट्रगीत झाले व मोर्चाचा समारोप तहसीलदार चंद्रकांत देवगुणे यांना तेजस्विनी अहेर, धनश्री अहेर, शिवानी इघे, ऋतुजा अहेर, जागृती वाघ यांच्या हस्ते निवेदन देऊन करण्यात आला. (वार्ताहर)