शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये सीझफायर; पुतीन यांनी दिली मंजुरी, ३२ तासांसाठी...
2
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
3
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
4
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
5
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
6
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
7
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
8
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
9
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
10
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
11
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
12
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
13
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
14
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
15
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
16
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
17
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
18
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
19
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
20
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

सभापतीपदासाठी वर्षा खडकेंचे नाव चर्चेत स्थायी समिती : सदस्यांची २६ रोजी होणार निवड

By admin | Updated: September 23, 2016 00:49 IST

जळगाव: मनपा स्थायी समिती सभापती नितीन बरडे यांच्यासह समितीतील १६ पैकी ८ सदस्य ३० सप्टेंबर रोजी निवृत्त होत आहेत. त्यामुळे नवीन सदस्यांची २६ रोजीच्या महासभेत निवड होणार असून सभापतीपदासाठी खाविआतर्फे वर्षा खडके यांचे नाव चर्चेत असल्याचे समजते.

जळगाव: मनपा स्थायी समिती सभापती नितीन बरडे यांच्यासह समितीतील १६ पैकी ८ सदस्य ३० सप्टेंबर रोजी निवृत्त होत आहेत. त्यामुळे नवीन सदस्यांची २६ रोजीच्या महासभेत निवड होणार असून सभापतीपदासाठी खाविआतर्फे वर्षा खडके यांचे नाव चर्चेत असल्याचे समजते.
रिक्त होत असलेल्या ८ सदस्यांच्या जागी खाविआचे ४, भाजपाचे २ तर मनसे व राष्ट्रवादीचे प्रत्येकी १ सदस्य निवडून येणार आहेत. गटनेते २६रोजीच्या महासभेत ही नावे बंद पाकिटात महापौरांकडे देतील. त्यात सभेत शिक्कामोर्तब करण्यात येणार आहे.
खाविआतर्फे सभापती नितीन बरडे यांना समितीत सदस्य म्हणून पुन्हा संधी दिली जाणार असून त्यांच्यासोबतच चेतन शिरसाळे, अजय पाटील, वर्षा खडके यांची नावे चर्चेत आहेत. तर भाजपातर्फे ॲड.शुचिता हाडा, नवनाथ दारकुंडे, उज्ज्वला बेंडाळे, जयश्री पाटील, दीपमाला काळे यांची नावे चर्चेत आहेत. मात्र माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्याशी चर्चा करूनच नावे अंतिम करण्यात येतील. तर मनसेतर्फे विजय कोल्हे, राष्ट्रवादीतर्फे शालिनी काळे यांची नावे चर्चेत असल्याचे समजते.
२६ रोजीच्या महासभेत सदस्यांची निवड झाल्यानंतर सभापतीनिवडीसाठी सभा आयोजित करण्याबाबत विभागीय आयुक्तांकडे प्रस्ताव पाठविला जाईल. त्यानंतर विशेष सभेत ही निवड केली जाईल.