शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
2
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
3
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
4
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
7
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
8
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
9
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
10
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
11
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
12
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
13
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
14
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
15
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
16
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
17
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
18
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
19
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
20
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
Daily Top 2Weekly Top 5

हलालाच्या नावाखाली पतीनं पत्नीला मित्राशी सेक्स करण्यास पाडले भाग

By admin | Updated: May 18, 2017 11:31 IST

पत्नीला तोंडी तलाक दिल्यानंतर हलालाच्या नावाखाली मित्रांसोबत रात्र घालवण्यासाठी पतीनं विवश केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला

ऑनलाइन लोकमतजयपूर, दि. 18 - पत्नीला तोंडी तलाक दिल्यानंतर हलालाच्या नावाखाली मित्रांसोबत रात्र घालवण्यासाठी पतीनं विवश केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकारानंतर पीडित महिलेनं पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे मदतीची याचना केली आहे. जयपूरमधील आमेर रोडवरील 40 वर्षांच्या एका महिलेचा पती ठेकेदारी आणि मालमत्तेच्या दलालीचं काम करतो. तसेच त्याला दारू आणि जुगाराचंही व्यसन आहे. त्याची आर्थिक स्थिती अत्यंत कमकुवत असल्यानं पती-पत्नीमध्ये वारंवार भांडण होत असे. जवळपास 9 महिन्यांपूर्वी त्या ठेकेदारानं स्वतःची दोन मुलं आणि कुटुंबीयांसमोर स्वतःचा पत्नीला तोंडी तलाक दिला. त्याच्या दोन दिवसांआधीच त्यानं कुटुंबीयांसमोरच काही कागदपत्रांवर पत्नीच्या अंगठ्याचे ठसे घेतले होते. तलाकनंतरही ती पीडित महिला पतीच्या घरीच राहत होती. मात्र एक दिवस तो स्वतःच्या मित्रांसमवेत जुगार खेळत होता. त्यावेळी मित्रांनी त्यांच्याशी पैज लावली की, जर त्याचा जुगारात पराभव झाला, तर एका रात्रीसाठी स्वतःच्या पत्नीला मित्रांकडे पाठवले. ठेकेदार जुगारत पैज हारला आणि त्यानं पत्नीला पुन्हा निकाह करण्याच्या नावाखाली एका फार्म हाऊसवर नेलं. तिथे त्याचा मित्र पहिल्यापासूनच उपस्थित होता. त्यानंतर दोन्ही मित्र बसून दारू पिऊ लागले आणि त्याने पत्नीला दिलेल्या ज्यूसमध्ये झोपेच्या गोळ्या टाकल्या. त्यामुळे पत्नी ज्यूस प्यायल्यानंतर बेशुद्ध झाली. त्याच वेळी त्या दोन मित्रांनी पत्नीवर अत्याचार केले आणि ठेकेदारानं त्याचा एक व्हिडीओही बनवला. मध्यरात्री पत्नी शुद्धीवर आल्यानंतर मोठमोठ्यानं ओरडली. मात्र दोन्ही मित्रांनी तिला धमकावून गप्प केलं. दुस-या दिवशी सकाळी ठेकेदार पत्नीला घेण्यासाठी फार्म हाऊसवर आला. त्यावेळी त्यानं पत्नीला सांगितलं की, तुला पुन्हा स्वीकारण्यासाठी हलाला गरजेचा होता. शरीयतमध्ये हलाला आवश्यक असतो. ठेकेदार पत्नीला म्हणाला, आता तू दुस-यासोबत एक रात्र घालवली आहेस. ठेकेदारानं पत्नीला व्हिडीओही दाखवला आणि तो पत्नीशी जबरदस्तीनं संबंध प्रस्थापित करू लागला. एक दिवशी पत्नीनं थेट पोलीस स्टेशन गाठलं आणि पोलिसांकडे रीतसर तक्रार केली. मात्र पोलिसांनी हे धार्मिक प्रकरण असल्यानं तक्रार घेण्याचं टाळलं. पत्नीवर मुस्लिम समाज पतीविरोधातील तक्रार मागे घेण्यासाठी आता दबाव टाकत आहेत. त्यामुळे त्या पीडित महिलेनं अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदींकडेच मदतीची याचना केली आहे.