शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
2
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
3
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
4
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
7
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
8
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
9
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
10
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
11
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
12
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
13
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
14
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
15
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
16
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
17
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
18
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
19
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
20
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
Daily Top 2Weekly Top 5

नाईक यूपीचे, कोहली गुजरातचे राज्यपाल

By admin | Updated: July 15, 2014 02:53 IST

नरेंद्र मोदी सरकारने भाजपाच्या ज्येष्ठ नेत्यांना राज्यपालपदांची ‘बक्षिसी’ देण्यास सुरुवात केली

नवी दिल्ली : नरेंद्र मोदी सरकारने भाजपाच्या ज्येष्ठ नेत्यांना राज्यपालपदांची ‘बक्षिसी’ देण्यास सुरुवात केली असून, त्याअंतर्गत माजी केंद्रीय मंत्री राम नाईक यांना उत्तर प्रदेशचे तर पक्षाचे ज्येष्ठ नेते ओ़पी़ कोहली यांना गुजरातचे राज्यपालपद देण्यात आले आहे़ राष्ट्रपती भवनाने राज्यपालांच्या नियुक्त्यांची माहिती जारी केले आहे़ त्यानुसार राम नाईक उत्तर प्रदेशचे, ओ़पी़ कोहली यांना गुजरातचे, माजी विधानसभा अध्यक्ष केसरीनाथ त्रिपाठी यांना पश्चिम बंगालचे तर बलराम दास टंडन छत्तीसगडचे राज्यपाल नियुक्त करण्यात आले आहे़ नाईक हे गांधी घराण्याचे निकटस्थ समजले जाणारे बी़एल़ जोशी यांची जागा घेतील़ मोदी सरकारच्या निर्देशानंतर राज्यपालपदाचा राजीनामा देणारे जोशी हे पहिले राज्यपाल होते़ तीनदा खासदार राहिलेले ८० वर्षीय नाईक यांनी १९९४ मध्ये कर्करोगासारख्या आजारावर मात केली होती़ २०१३ मध्येच आपण २०१४ ची निवडणूक लढणार नसल्याची घोषणा त्यांनी केली होती़ १९९४ ते २००० पर्यंत राज्यसभा सदस्य राहिलेले ७८ वर्षीय कोहली हे कमला बेनीवाल यांची जागा घेतील़ मोदी सरकारने बेनीवाल यांना यावर्षी नोव्हेंबरपर्यंतच्या त्यांच्या उर्वरित कार्यकाळासाठी मिझोरमचे राज्यपाल म्हणून पाठवले आहे़ केसरीनाथ त्रिपाठी हे पश्चिम बंगालमध्ये एम़ के. नारायणन यांची जागा घेतील़ अनेक साहित्य रचना करणारे त्रिपाठी यावर्षी नोव्हेंबरमध्ये ८० वर्षांचे होत आहेत़ बलरामदास टंडन यांना छत्तीसगडचे राज्यपाल नियुक्त करण्यात आले आहे़