शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
2
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
3
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
4
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
5
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
6
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
7
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
8
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
9
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
10
Payal Nag : नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
11
LSG vs GT : पंतसमोर पहिला डाव जिंकला; गिलचा आनंद गगनात मावेना! 'तो' व्हिडिओ व्हायरल
12
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
13
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
14
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
15
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
16
अमेरिका-इराण चर्चा निष्फळ! पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया आली समोर; परराष्ट्र मंत्री इशाक डार म्हणाले...
17
“चंदेरी दुनियेच्या सफरीचा आनंद देणारा दैवी आवाज शांत झाला”; DCM शिंदेंकडून आशाताईंना आदरांजली
18
Asha Bhosale Songs: आशा भोसलेंची 'ही' गाणी प्रचंड गाजली! आजही ऐकली की चेहऱ्यावर हसू अन् डोळ्यांत पाणी येतं
19
आशा ताईंना सर्वात जास्त प्रिय होता 'डाळ-भात', स्वतः बनवायच्या 'हे' खास लोणचं; साध्या राहणीमानानंही जिंकली चाहत्यांची मनं
20
२० भाषा अन् १२ हजारांहून अधिक गाणी! 'असा' होता आशा भोसले यांचा संगीत विश्वातील प्रवास
Daily Top 2Weekly Top 5

एनडीटीव्हीवरील बंदीचे नायडू यांनी केले समर्थन

By admin | Updated: November 6, 2016 09:08 IST

एनडीटीव्ही इंडिया या हिंदी वृत्तवाहिनीवर घालण्यात आलेल्या एक दिवसाच्या बंदीचा सर्वत्र निषेध होत असताना आणि हा प्रकार म्हणजे माध्यम स्वातंत्र्यावर आघात आहे

चेन्नई - एनडीटीव्ही इंडिया या हिंदी वृत्तवाहिनीवर घालण्यात आलेल्या एक दिवसाच्या बंदीचा सर्वत्र निषेध होत असताना आणि हा प्रकार म्हणजे माध्यम स्वातंत्र्यावर आघात आहे, अशी टीका होत असली त्यांचा केंद्र सरकारवर काहीही परिणाम झालेला नाही. किंबहुना माहिती व प्रसारण मंत्री व्यंकय्या नायडू यांनी बंदीचे जोरदार समर्थन केले आहे. देशाची सुरक्षा लक्षात घेऊनच या वृत्त वाहिनीवर बंदी घालण्यात आली आहे, असे त्यांनी म्हटले आहे.एनडीटीव्हीवर बंदी घालून सरकार मागच्या दाराने आणीबाणी लादीत असून प्रसार माध्यमांना धमकावण्याचा हा प्रकार आहे, अशी टीका होत आहे. या पार्श्वभूमीवर येथे आयोजित पत्रकार परिषदेत नायडू म्हणाले की, रालोआ सरकारला माध्यमांच्या स्वातंत्र्याचा सर्वोच्च आदर आहे. अशा मुद्यांचे राजकारण केल्यास देशाच्या सुरक्षेवरच परिणाम होऊ शकतो. काही लोक देशात आणीबाणी सारखी स्थिती असल्याचा आरोप करीत आहेत. मला त्याचे आश्चर्य वाटते. वृत्तवाहिनीवर बंदी घालण्याची ही पहिलीच वेळ आहे, असल्याचे आज मी वृत्तपत्रात वाचले. हे लोक असे कसे काय म्हणत आहेत. यापूर्वी वाहिन्यांवर किती वेळा बंदी घालण्यात आली, याची यादी मी देऊ का? एएक्सएनवर दोन महिन्यांसाठी बंदी घालण्यात आली होती. एफटीव्हीवरही दोन महिन्यांची बंदी घालण्यात आली होती. याशिवाय एन्टर १0 वाहिनीवर एक दिवसाची, एबीएन आंध्रज्योतीवर सात दिवस, अल जझिरावर पाच दिवसांची बंदी घालण्यात आली होती. नायडू म्हणाले की, काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी आणीबाणीच्या काळ््या दिवसांबाबत बोलत आहेत. आणीबाणी काय आहे, हे तरी तुम्हाला माहिती आहे का? आज टीका करणारे देशात आणीबाणी लादली होती, तेव्हा काँग्रेसमध्ये होते. सरकारवर तसेच पंतप्रधानांवर टीका करण्यासाठी हे लोक संधीच शोधत असतात. (वृत्तसंस्था) >बंदी आणीबाणीकडे नेईलएनडीटीव्हीवरील बंदी देशाला दुसऱ्या आणीबाणीच्या दिशेने घेऊन जाईल, अशी टीका द्रमुक नेते एम. करुणानिधी यांनी केली. पक्षाचे मुखपत्र ‘मुरासोली’मध्ये लिहिलेल्या एका लेखात ९३ वर्षीय करुणानिधी यांनी म्हटले की, या बंदीने मला आणीबाणीची आठवण झाली आहे. केंद्र सरकार अशाच कारवाया करीत राहिले तर देशात पुन्हा आणीबाणी येईल.