गुरू गोविंदसिंग जयंतीनिमित्त नगर कीर्तन
By admin | Updated: December 21, 2014 23:49 IST
नवी मुंबई : गुरू गोविंदसिंग यांच्या जन्मदिनाच्या पार्श्वभूमीवर नगर कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते. कोपरखैरणे ते वाशी दरम्यान निघालेल्या या नगर कीर्तनामध्ये बारा हजारहून अधिक शीख बांधव सहभागी झाले होते. शहरातील ९ गुरुद्वारांच्या वतीने याचे आयोजन करण्यात आले होते.
गुरू गोविंदसिंग जयंतीनिमित्त नगर कीर्तन
नवी मुंबई : गुरू गोविंदसिंग यांच्या जन्मदिनाच्या पार्श्वभूमीवर नगर कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते. कोपरखैरणे ते वाशी दरम्यान निघालेल्या या नगर कीर्तनामध्ये बारा हजारहून अधिक शीख बांधव सहभागी झाले होते. शहरातील ९ गुरुद्वारांच्या वतीने याचे आयोजन करण्यात आले होते. गुरूगोविंदसिंग हे शिखांचे शेवटचे गुरु मानले जातात. २८ डिसेंबर रोजी त्यांचा ३४६ वा जन्मदिवस आहे. त्यानुसार गुरु गोविंदसिंग यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून रविवारी नगर कीर्तन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यानुसार कोपरखैरणे गुरुद्वारा ते वाशी गुरुद्वारादरम्यान पदयात्रा काढण्यात आली. वाशी येथील गुरुद्वाराच्या माध्यमातून शहरातील ९ गुरुद्वारांच्या सहभागातून या नगर कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये १२ हजारहून अधिक शीख बांधवांनी सहभाग घेतला होता. यादरम्यान पायी चालणार्या भक्तांनी भजनाचे पठन करत नागरिकांना गुरु गोविंदसिंग यांच्या कार्याची माहिती देखील देण्यात आली. त्यामध्ये वाशी गुरुद्वाराचे प्रधान गुरबचन सिंग परवाना, प्रवक्ता केसर सिंग, चरणजितसिंग परवाना यांचाही समावेश होता. वाशी सेक्टर २९ येथे सर्व भाविकांसाठी प्रसादाचीही सोय करण्यात आली होती. यादरम्यान वाहतूक कोंडी टाळण्यासाठी वाहतूक पोलिसांनी सदर मार्गावर वाहनांना प्रवेशबंदी देखील केली. नगर कीर्तनमध्ये सहभागी झालेल्यांसाठी गुरुद्वारांच्या वतीने ठिकठिकाणी जलपानाची सोय देखील करण्यात आली होती. (प्रतिनिधी)फोटो. २१ गुरुगोवींदसिंह जयंती