शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
3
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
4
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
5
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
6
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
7
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
8
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
9
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
10
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
11
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
12
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
13
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
14
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
15
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
16
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
17
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
18
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
19
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
20
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

मुस्लिम महिलांना गुलामासारखे वागवले जाते - साक्षी महाराज

By admin | Updated: April 17, 2016 18:48 IST

हिंदू धर्मामध्ये महिला ज्या प्रमाणे मंदिरात मुक्तपणे पूजा करतात त्याप्रमाणे मुस्लिम महिलांना मशिदीमध्ये नमाजपठणाची परवानगी दिली पाहिजे असे साक्षी महाराज म्हणाले.

ऑनलाइन लोकमत 

उन्नाव, दि. १७ - उत्तरप्रदेशातील उन्नावचे भाजप खासदार साक्षी महाराज यांनी पुन्हा एकाद वादग्रस्त वक्तव्य केले आहे. मुस्लिम धर्मामध्ये महिलांना गुलामासारखी वागणूक दिली जाते असे त्यांनी म्हटले आहे. हिंदू धर्मामध्ये महिला ज्या प्रमाणे मंदिरात मुक्तपणे पूजा करतात त्याप्रमाणे मुस्लिम महिलांना मशिदीमध्ये नमाजपठणाची परवानगी दिली पाहिजे असे साक्षी महाराज म्हणाले. 
 
उन्नावच्या गादन खेडा येथे आपल्या निवासस्थानी ते पत्रकारांशी बोलत होते. मुस्लिम महिलांना त्यांचे अधिकार मिळवून देण्यासाठी न्यायालयाने हस्तक्षेप करावा अशी मागणी त्यांनी केली. भारत देश फतव्यांवर नाही तर, संविधानानुसार चालतो असे त्यांनी सांगितले. शिर्डीचे साईबाबा आणि शनी देवाची पूजा करु नका असे सांगणा-या शंकराचार्यांवरही त्यांनी जोरदार टीका केली. 
 
अशी विधाने करणारे स्वामी स्वरूपानंद सरस्वती शंकराचार्य बनण्यासाठी पात्र आहेत का ? असा सवाल साक्षी महाराजांनी विचारला. समाजामध्ये फूट पाडण्यासाठी ते अशी विधाने करत आहेत. या शंकराचार्यांना काँग्रेसने प्रेरणा दिली आहे. काँग्रेसच्या फोडा आणि राज्य करा या  नितीप्रमाणे ते राजकारण करत आहेत असा आरोप त्यांनी केला. महत्वाच्या धार्मिक मुद्यांवर चर्चा करण्यासाठी त्यांनी शंकराचार्य स्वरुपानंद सरस्वती यांना खुले आव्हान दिले आहे.