प्रयोगातून संगीत नेहमीच समोर जाते (भाग २)
By admin | Updated: February 13, 2015 23:11 IST
शास्त्रीय संगीत सादर करणारे अनेक कलावंत आहेत. पण मला यातून जरा हटके करावेसे वाटले. त्यामुळेच शास्त्रीय बैठक असलेला ठुमरी आणि दादरा हा प्रकार मला आत्मसात करावासा वाटला. त्यापूर्वी शास्त्रीय संगीताचाच रियाज मी केला. पण आपला आवाज आणि सादरीकरणासाठी ठुमरी योग्य आहे, असे वाटले आणि ठुमरी या प्रकाराचे शिक्षण घेतले. पण त्यात शास्त्रीय संगीतच आहे. बदलत्या काळात ठुमरी, दादरा लोकप्रिय होते आहे. शब्दप्रधानता आणि संगीत यामुळे लोकांना ती आवडते. याशिवाय नव्या पिढीला संगीताचे विविध प्रकार आणि पाश्चात्त्य संगीतही आवडते त्यामुळे माझ्या गायनात वेगवेगळे प्रयोग केले आणि रसिकांना ते आवडलेही. युवकांना पाश्चात्त्य संगीत आवडते, त्यात वाईट काहीच नाही पण प्रथम आपले संगीत शिकले पाहिजे, असे त्या म्हणाल्या. नागपूरचे रसिक जाणकार आहेत. त्यांच्यासमोर सादर
प्रयोगातून संगीत नेहमीच समोर जाते (भाग २)
शास्त्रीय संगीत सादर करणारे अनेक कलावंत आहेत. पण मला यातून जरा हटके करावेसे वाटले. त्यामुळेच शास्त्रीय बैठक असलेला ठुमरी आणि दादरा हा प्रकार मला आत्मसात करावासा वाटला. त्यापूर्वी शास्त्रीय संगीताचाच रियाज मी केला. पण आपला आवाज आणि सादरीकरणासाठी ठुमरी योग्य आहे, असे वाटले आणि ठुमरी या प्रकाराचे शिक्षण घेतले. पण त्यात शास्त्रीय संगीतच आहे. बदलत्या काळात ठुमरी, दादरा लोकप्रिय होते आहे. शब्दप्रधानता आणि संगीत यामुळे लोकांना ती आवडते. याशिवाय नव्या पिढीला संगीताचे विविध प्रकार आणि पाश्चात्त्य संगीतही आवडते त्यामुळे माझ्या गायनात वेगवेगळे प्रयोग केले आणि रसिकांना ते आवडलेही. युवकांना पाश्चात्त्य संगीत आवडते, त्यात वाईट काहीच नाही पण प्रथम आपले संगीत शिकले पाहिजे, असे त्या म्हणाल्या. नागपूरचे रसिक जाणकार आहेत. त्यांच्यासमोर सादर करणे हा आनंदाचाच विषय आहे, असेही त्यांनी सांगितले.