मुश्रीफ यांनी मागितली मातंग समाजाची माफी
By admin | Updated: August 12, 2015 00:35 IST
- कदमांकडून पदाचा गैरवापर : अण्णा भाऊ साठे महामंडळातील गैरव्यवहार
मुश्रीफ यांनी मागितली मातंग समाजाची माफी
- कदमांकडून पदाचा गैरवापर : अण्णा भाऊ साठे महामंडळातील गैरव्यवहार कागल : मातंग समाजाच्या विकासासाठी लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या नावाने महामंडळ कार्यरत आहे. गोरगरीब आणि उपेक्षितांचे जिणे जगणार्या मातंग समाजाचा आर्थिक विकास व्हावा म्हणून शासनानेही भरीव आर्थिक निधी दिला. मात्र, आमच्या पक्षाचे आमदार रमेश कदम यांनी महामंडळाच्या अध्यक्षपदाचा गैरवापर करीत गैरव्यवहार केले. त्याबद्दल समस्त मातंग समाजाची मी माफी मागतो, असे प्रतिपादन हसन मुश्रीफ यांनी येथे केले.येथे हसन मुश्रीफ युवा शक्ती संघटनेतर्फे आयोजित मांतग समाज मेळाव्यात ते अध्यक्षस्थानी होते. मुश्रीफ म्हणाले, साठे महामंडळातील गैरव्यवहारचे प्रकार वाचून मी थक्क झालो. एवढा मोठा निधी जर मातंग समाजाला प्रामाणिकपणे मिळाला असता, तर कितीतरी कुटुंबे अर्थिकदृष्ट्या सक्षम झाली असती. मातंग समाजाच्या विकासासाठी यापुढेही मी सदैव तत्पर राहणार आहे. प्रा. शरद कांबळे म्हणाले, अण्णा भाऊ साठे यांनी दुर्बल समाज व्यवस्थेबद्दलची तळमळ साहित्यातून मांडली. विश्वातील अनेक वैचारिक घटनांचे प्रतिबिंब त्यांच्या साहित्यातून दिसते, म्हणून ते विश्वरत्न आहेत. (प्रतिनिधी)