शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
2
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
3
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
4
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
5
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
6
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
7
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
8
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
9
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
10
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
11
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
12
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
13
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
14
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
15
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
16
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
17
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
18
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
19
आता उपराजधानीत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ, १२० कोटींचा निधी मंजूर
20
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
Daily Top 2Weekly Top 5

राजकारण प्रवेशातच मुलायम यांच्या सुनबाई अपर्णा यादवांच्या पदरी निराशा

By admin | Updated: March 11, 2017 20:26 IST

काँग्रेसमधून भाजपावासी झालेल्या रिटा बहुगुणा जोशींनी अपर्णा यादव यांचा मोठा मताधिक्क्यानं पराभव केला

ऑनलाइन लोकमतलखनऊ, दि. 11 - गेल्या अनेक वर्षांपासून उत्तर प्रदेशात एकहाती सत्ता गाजवणा-या समाजवादी पार्टीला गाशा गुंडाळावा लागला आहे. भाजपानं सत्ताधारी समाजवादी पक्षाचा थोडाथोडका नव्हे, तर मोठा पराभव केला आहे. विशेष म्हणजे मुलायम सिंह यांच्या धाकट्या सूनबाई अपर्णा यादव यांनाही पर्दापणात पराभव पत्करावा लागला आहे. काँग्रेसमधून भाजपावासी झालेल्या रिटा बहुगुणा जोशींनी अपर्णा यादव यांचा मोठा मताधिक्क्यानं पराभव केला आहे.लखनऊ कँटोनमेंटमधून अपर्णा यादव यांना पराभवाला सामोरं जावं लागलं आहे. अपर्णा यादव यांच्या कारकिर्दीत त्यांनी पहिल्यांदाच ही निवडणूक लढवली होती. अपर्णा यादव यांनी मतदारसंघात अनेक सभा आणि रॅलीही घेतल्या होत्या, मात्र विरोधात असलेल्या रिटा बहुगुणा जोशींसारख्या ताकदवान उमेदवारासमोर त्यांचा निभाव लागला नाही.अपर्णा यादव यांच्या विजयासाठी लखनऊ कँटोनमेंट मतदारसंघात सासरे मुलायम सिंह यांच्याप्रमाणेच अखिलेश यांच्या पत्नी डिंपल यादव यांनीही सभा घेतल्या होत्या. मात्र या निवडणुकीत यादव कुटुंबीयांना जनतेनं सपशेल नाकारलं आहे. अपर्णा या मुलायम यांच्या दुसऱ्या पत्नी साधना गुप्ता यांचा मुलगा प्रतीकच्या पत्नी आहेत. अपर्णा यादव यांच्याजवळ लँबोर्गिनी कारसह 23 कोटी रुपयांची मालमत्ता आहे.

(स्वातंत्र्यानंतर नरेंद्र मोदी हे सर्वात ताकदवान नेते - अमित शाह)(प्रशांत किशोर यांच्या रणनीतीला अपयश, करिअरवर टांगती तलवार)उत्तर प्रदेशात भाजपानं 315 हून अधिक जागा जिंकल्या आहेत. काँग्रेस आणि सपा यांची आघाडी असून सपाला 60च्या घरात जागा मिळवता आल्यानं पराभवाची नामुष्की ओढावली आहे.अखिलेश यादवांच्या 5 वर्षांच्या कारकिर्दीत ढासळलेली कायदा व सुव्यवस्था, मुझफ्फरनगरसह राज्याच्या विविध भागातल्या दंगली, नोकऱ्यांपासून सर्व क्षेत्रात यादव समाजाला मिळणारे प्राधान्य, आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये समन्वयाचा अभाव, अशा विविध कारणांमुळे मतदारांची नाराजी मतदानातून स्पष्ट झाली आहे.